"भीमाशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हे भारतातील पुणे जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणावरील सर्वात प्रसिद्ध गोष्ट आहे म्हणजे येथील ज्योतिर्लिंग मंदीर. भारतातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक येथे आहे. येथील ज्योतिर्लिंगामधून भीमा नदी उगम पावते जी पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे.
 
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात विविध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात. [[रानडुक्कर]], [[सांबर]] ,[[भेकर]],[[रानमांजर]], [[रानससा|रानससे ]],[[उदमांजर]], [[बिबट्या]] हे प्राणी येथे आढळतात. येथील सर्वात वैशिठ्यपूर्ण प्राणी म्हणजे [[शेकरू]]. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त येथील जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
 
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
 
* '''गुप्त भीमाशंकर''' - भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तीथूनतिथून गुप्त होते असे मानले जाते. मंदीरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पुर्वेला ती पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
 
* '''कोकण कडा'''- भीमाशंकर मंदीराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा [[अरबीसमुद्र|अरबीसमुद्रही]] दिसू शकतो.
 
* '''सीतारामबाबा आश्रम'''- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
 
* '''नागफणी''' - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. व थोडेफार [[ट्रेकिंग]] करून जावे लागते. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. [[कोकण|कोकणातून]] हे शिखर [[नाग|नागाच्या]] फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमाशंकर" पासून हुडकले