"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Raj jadhav (चर्चा)यांची आवृत्ती 231577 परतवली.
No edit summary
ओळ १:
== संबोधनाचा उगम ==
बौद्ध धर्म भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि दर्शन आहे. ह्याचे प्रस्थापक महात्मा बुद्ध शाक्यमुनि (गौतम बुद्ध) होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या मृत्यनंतर पुढील पाच शतकात बौध्द धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. बौद्ध धर्माचे पस्तीस कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे.
 
भारतामधे बौद्ध धर्माचे साधारण पणे ई.स. ५०० पर्यन्त समूळ उच्चाट्न झाले. भारतातील बौद्धधर्मीय काही कालान्तराने इतर धर्म, पंथांमधे लुप्त झाले. जे लोक बौद्ध धर्माची धुरा अध:पतना नंतरही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत राहीले त्याना नंतर अस्प्रुश्य म्हणून वागविले गेले. अस्प्रुश्यांवरील लादलेल्या शिक्षणावरील बंदीमुळे कालांतराने त्यांचा इतिहास पुसला गेला. बौद्ध धर्म केवळ त्यांच्या संस्क्रृती आणि प्रथांमधे शिल्लक राहीला.
इ. स. १९५६ मधे बोधिसत्व डॊ. भीमराव रामजी आंबेड्कर यानी नागपूर येथे ५ लक्ष भाविकांसमवॆत बौद्ध धर्माची दिक्शा घेऊन या धर्माची भारत भूमी मध्ये पुन्रस्थापना करून अस्प्रूश्यांना स्वधर्मामधे आणले. भारतातील करोडो अस्प्रूश्यांना या घट्नेने एक नवा आशेचा किरण दिसला आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरी मधून त्यांची मुक्तता झाली. य़ा घटनेनंतर बौद्ध धर्माचा पुन:स्विकार केलेल्या समाजाला नव बौद्ध असे संबोधाले जाते.
 
 
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले