"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,८१९ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
 
:सर्वप्रथम २०००० लेख पूर्ण केल्याबद्दल मराठी विकिपीडियाचे मनापासून अभिनंदन! बरेच लेख एकदोन ओळींचेच असतात असे असले तरी हा आकडा देखील काही कमी नाही. ( हिंदी विकीला मागे टाकण्यासाठी जरा वेग वाढवावा लागेल. ;-)आणि तेलगू तर खूपच पुढे निघून गेले आहेत. :-( असो. मला वाटतं सदस्य प्रवेश हा दुवा बर्‍याच जणांना दिसत नसावा. ;-) सदस्य प्रवेशाची मुखपृष्ठावर अगदी कोपर्‍यात दिसणारी जागा खाली कुठे आणता येईल का? बरेच जण अगदी कुठेही (विकीपीडिया प्रबंधक किंवा लेख संपादन स्पर्धा या पानात) संपादन करुन त्यांचं म्हणणं मांडत असतात. '''सदस्यत्व घेणे आणि सदस्यत्वाचे फायदे याबाबत मुखपृष्ठावर लक्षवेधक असे काही करता येईल का?''' शिवाय मुखपृष्ठावरच्या स्वागताच्या ओळींमध्ये 'तुमचे प्रश्न अथवा शंका (डाव्या समासात असलेल्या)चावडीवर विचारा' अशी ओळ टाकण्याची सूचना करावी वाटते.[[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] १३:२८, २३ सप्टेंबर २००८ (UTC)
 
:सर्वप्रथम विकिजनांचे मनःपूर्वक अभिनंदन !
:मराठी विकिपीडियाने २०,००० लेखांचा टप्पा ओलांडणे ही खचितच एक महत्वपूर्ण बाब आहे आणि विशेषतः विकिजनांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली झालेली ही वाटचाल आहे.
:पुढे हेच ओझे आपली शिदोरी ठरेल ही माझी आशा आहे.
:आता विकिपीडियाच्या संरचनेबद्दलच्या चर्चेसंदर्भात माझे दोन आणे !
:विकिपीडिया हा मुक्तकोश (मुक्त + विश्वकोश) आहे. सर्व प्रकारची (*अगदी सर्व प्रकारची*) माहिती या कोशात असणे अभिप्रेत आहे.
:प्रश्न केवळ माहितीच्या प्रतीचा (quality) आहे. जो काही विकिपीडियाचा भाग आहे, तो सर्व अचूक आणि शुद्ध असावा.
:संकल्पने ही सूचना या आधीच केलेली आहे.
:प्रत्येकाचा वाटा खारी एवढा असला तरी देखील मराठी विकिपीडिया संपन्न बनेल यात शंका नसावी.
:[[सदस्य:Harshalhayat|Harshalhayat]] १८:२५, २३ सप्टेंबर २००८ (UTC)
 
माझ्यातर्फेपण मराठी विकिपीडियाचे मनापासून अभिनंदन! संकल्प यांच्या सूचनेशी मी सहमत आहे. पण त्यात मला थोडी भर घालावी वाटत आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक हा ’मराठी माणूस’ आहे. त्यामुळॆ कमीत कमी मराठी आणि महाराष्ट्राशी निगडित लेख प्रार्थमिकतेने पूर्ण झाले पाहिजेत. कमीत कमी मराठी सण, साहित्य आणि साहित्यिक, स्थळे, पाककृती, राजकारण, समाजकारण, क्रिडा etc. यांच्यावरच्या लेखांसाठी जर ’साक्षर आणि इंग्रजी जाणणारा’ मराठी माणूस इंग्रजी विकिकडॆ न वळता मराठी विकिकडॆ आला तर ती एक मोठी उपलब्धी ठरेल. Let user go to English wiki for information on "U.S. Elections", पण पु.ल. देशपांडेंबद्दल दर्जेदार माहितीसाठी तो मराठी विकिकडेच वळला पाहिजे. माझ्या मते मराठी विकि सर्वसमावेशक असावाच असा अट्टाहास असणे योग्य नाही. (तो भविष्यात तसा झाला तर उत्तमच).<br>
४,०९९

संपादने