"व्याघ्रप्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो सांगकाम्याने वाढविले: en:Project Tiger, fr:Project Tiger, ta:ப்ராஜெக்ட் டைகர்
ओळ १:
व्याघ्रप्रकल्प अथवा प्रोजेक्ट टायगर या नावाने प्रसिद्ध असलेला प्रकल्प [[भारत]] सरकार तर्फे चालवण्यात येतो. यात मुख्यत्वे भारतीय वाघांचे संरक्षण करणे हा मुख्य हेतु आहे. वाघांच्या संरक्षणा अतंर्गत त्यांच्या वस्तीस्थानाचे संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करणे गृहित आहे. वन्य वाघांची संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. भारतात सध्या सुमारे ३५०० पर्यंत वन्य वाघ आहेत असा अंदाज आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते. परंतु बंदुकीमुळे वाघांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व शिकार करणे काही लोकांसाठी छंद बनला. वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने वाघांचे पाळिव प्राण्यांवरील हल्ले वाढले परीणामी वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून पण विषप्रयोग करुन त्यांच्या शिकार करण्यात आली. १९७० च्या सुरुवातीला केवळ १७०० वाघ उरले व भारत सरकार खाडकन जागे झाले व १९७२ मध्ये वन्य जीव संरक्षण कायदा करण्यात आला. त्यानुसार वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातींवरील शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्रप्रकल्पांच्या स्थापनेस चालना मिळाली.
व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांची संख्या वाढण्यास अनमोल मदत झाली परंतु त्यामुळे चोरट्या शिकारींचा सुळसुळाट झाला व ९० च्या दशकानंतर पुन्हा वाघांच्या शिकारीत वाढ झाली. मुख्यत्वे चीनमधील विविध प्रकारच्या औषधांसाठी वाघाच्या हाडांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही चीनमध्ये काहीही फरक पडलेला नाही.
 
[[en:Project Tiger]]
[[fr:Project Tiger]]
[[ta:ப்ராஜெக்ட் டைகர்]]