"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
माणेकशॉ यांचा जन्म [[पंजाब|पंजाबमधील]] [[अमृतसर]] येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मुळचे [[वलसाड]] [[गुजराथ]] येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण [[नैनिताल]] येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी [[भारतीय मिलिटरी ऍकॅडमी]] मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणार्‍या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची [[सेकंड लेफ्टनंट]] पदी नियुक्ती झाली.
 
माणेकशॉ यांचे लष्करी कारकीर्द जवळपास चाळिस वर्षे इतकी दीर्घ राहिली. त्यांनी ब्रिटीश लष्करात व भारतीय लष्करात आपली कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८ , १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जापान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते.