"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
'''फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशा''' भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. जन्म: [[एप्रिल ३]], [[इ.स. १९१४|१९१४]] मृत्यू:[[जून २७]], [[इ.स. २००८|२००८]]
 
माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते. ७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती [[१९७१ चे भारत-पाक युद्ध|१९७१ च्या भारत-पाक युद्धात]] झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली [[पाकिस्तान|पाकिस्तानचा]] जबरदस्त पराभव केला व [[बांगलादेश|बांगलादेशाची]] निर्मिती केली.
 
या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.
 
 
माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे [[राष्ट्रपती]] [[वराहवेंकट गिरी]] यांनी माणेकशॉ यांना [[इ.स १९७२| १९७२]] [[पद्मभूषण]] या सन्मानाने सन्मानित केले. [[१ जानेवारी]] १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. [[१५ जानेवारी]] १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.
 
माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता [[न्युमोनिया|न्युमोनियाच्या]] दीर्घ दुखण्याने निधन झाले.