Content deleted Content added
ओळ २३१:
 
:आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. --[[User:Kaustubh|कौस्तुभ समुद्र]] ([[User talk:Kaustubh|चर्चा]]) १३:०१, १४ मे २००८ (UTC)
 
== प्रचालक अधिकार रद्द करणे ==
 
संकेत,
 
फारा दिवसांपूर्वी मी एक नियमावली येथे दिली होती. कदाचित जुन्या चर्चांमध्ये ती आढळेल. त्याला काहीच प्रतिसाद नाही मिळाला.
 
ही नियमावली मेटा वर असलेल्या नियमांनुसार होती व त्यात काही बदल मी सुचवले होती. आता नवीन नियमांची साधारण रुपरेषा अशी असावी.
 
# प्रचालकाने राजीनामा दिल्यास त्याने स्वतः मेटा वर आपले अधिकार रद्द करण्याची विनंती करावी.
# इतर वेळी --
:# एखाद्या सदस्याचे प्रचालकपद रद्द करण्याची विनंती कोणताही नोंद केलेला सदस्य करु शकतो. यासाठी स्वतः प्रचालक असणे आवश्यक नाही.
:# ही विनंती आधी चावडीवर करावी. तेथे चर्चा झाल्यावर काही काळाने (या साठीचे नियम - कमीत कमी दहा दिवस शिवाय शेवटच्या प्रतिसादानंतर ३ दिवस किंवा इतर प्रचालकांच्या संमतीने ३ दिवसांच्या आधी) हा प्रस्ताव कौल पानावर मांडावा.
:# कमीत कमी दोन आठवडे कौल घ्यावा. इतर प्रचालक किंवा प्रस्तावकर्ता ही मुदत वाढवू शकतात.
:# कमीत कमी पाच ''हो'' (अधिकार रद्द करावे) कौल असावे. यात प्रचालकांचे कौल मोजू नयेत (प्रचालकांचा मताविषयी खाली पहा.)
:# कौल देणार्‍यांत कमीत कमी एका प्रचालकाने ''हो'' (रद्द करावे) असा कौल दिलेला असावा.
:# एकापेक्षा जास्त प्रचालकांनी कौल दिल्यास प्रचालकांचे बहुमत असलेला कौल घेतला जाईल.
:# प्रचालकांचे ''नाही'' असे एकमत असल्यास त्याविरुद्ध अधिकार रद्द करता येणार नाहीत (सर्व कौल देणार्‍या प्रचालकांनी अधिकार रद्द करु नये म्हणल्यास त्यांचे मत ग्राह्य ठरेल.) प्रचालकांचे ''हो'' एकमत असल्यास इतर सदस्यांचा कौल ग्राह्य ठरेल (प्रचालकांनी अधिकार रद्द करावे म्हणले परंतु इतर सदस्यांनी ''नाही''चा कौल दिला तर अधिकार रद्द होणार नाहीत.)
 
वरील नियमांत शक्य तितके लोकशाही/बहुमताचा आदर केलेला आहे. त्याच बरोबर ठोकशाही (प्रचालकांची किंवा इतर सदस्यांची) चालणार नाही याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न आहे. यात काही बदल लागतील ते इतर सदस्यांच्या मताने केले जातील.
 
मी हाच संदेश चावडीवरही घालत आहे. त्यात बदल सुचवावेत.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:०८, १९ मे २००८ (UTC)