"नवेगाव राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
हे महाराष्ट्रातील [[गोंदिया]] जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.
 
'''जंगलाचा प्रकार'''
 
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते.
 
'''भौगोलिक'''
 
उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे.
 
==प्राणी जीवन==
 
नवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरीत पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस, क्रौंच, करकोचे, बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, बिबट्या अस्वल तरस, सांबर, निलगाय, रानगवा रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे सर्प आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात वैशिठ्य म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्गसाहित्यीक मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच अभयारण्यात केला होता. अजुन येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस क्रौंचाची एक जोडी नेहेमी असते. तसेच विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते.
 
==संदर्भ==
 
* अरण्यपुत्र - ले. सुरेशचंद्र वारघडे
 
 
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]