"मानस राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''मानस राष्ट्रीय उद्यान''' हे [[आसाम]] राज्यातील [[भारत]]-भूतान सीमेवरील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे येथील [[सोनेरी वानर]] व [[ढगाळ बिबट्या]] ज्याला इंग्रजीत Clouded Leopard असे म्हणतात. येथील सोनेरी वानर जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याच बरोबर अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पतींसाठी हे माहेरघर आहे. या उद्यानाचे नाव येथील वाहणार्‍या [[मानस नदी]]मुळे पडले आहे. मानस नदी [[ब्रह्मपुत्रा नदी|ब्रम्हपुत्रा नदीची]] एक प्रमुख उपनदी आहे.
 
या उद्यानाची स्थापना १९२८ मध्ये झाली व याचे क्षेत्रफळ ३६० किमी वर्ग इतके आहे. याची १९७३ मध्ये [[व्याघ्रप्रकल्प]] म्हणून घोषणा झाली. १९८५ मध्ये [[युनेस्को]]तर्फे या उद्यानाची [[:वर्ग:जागतिक वारसा स्थान|जागतिक वारसा स्थान]] म्हणून निवड करण्यात आली, मुख्य कारण म्हणजे केवळ येथेच आढळणारे प्राणी व पक्षी. राष्ट्रीय उद्यान असले तरी सीमेवर असल्यामुळे चोरट्या शिकारीचा तसेच दहशतवाद्यांचा उपद्रव खूप आहे.