"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २३:
[[Image:Marathi_modi_script.PNG]]
<br>
'''मराठी''' ही [[इंडो-युरोपीय]] भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. [[महाराष्ट्र]] आणि [[गोवा]] ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी<ref name="encarta">[http://encarta.msn.com/media_701500404/Languages_Spoken_by_More_Than_10_Million_People.html एनकार्टा- १ कोटीपेक्षा जास्त बोलणारे असलेल्या भाषा]</ref> व भारतातील चौथी भाषा आहे.<ref>[http://www.censusindia.gov.in/Census_Data_2001/Census_Data_Online/Language/Statement1.htm भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार]</ref> मराठी बोलणारयांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा १३०० वर्षांपासून प्रचलित आहे.<ref>[http://bhashaindia.com/Patrons/LanguageTech/Marathi.aspx भाषाइंडिया.कॉम- मराठी]</ref> मराठी भाषेची निर्मीती [[संस्कृत]] पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश द्वारे झाली आहे.
 
==भाषिक प्रदेश==
ओळ २९:
 
भारतात मराठी मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आंध्र प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[तामिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] राज्यात आणि [[दमण व दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- [[बडोदा]], [[सुरत]], दक्षिण गुजरात व [[अहमदाबाद]] (गुजरात राज्य), [[बेळगांव]], [[हुबळी]]- धारवाड, [[गुलबर्गा]], [[बिदर]], उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), [[हैद्राबाद]] (आंध्र प्रदेश), [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]] (मध्य प्रदेश) व [[तंजावर]] (तामिळनाडू)
 
==राजभाषा==
भारताचे संविधानातील २२ अनूसुचित (अधिकृत) भाषेत मराठीचा समावेश आहे.मराठी, [[महाराष्ट्र]] राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. [[गोवा|गोवा राज्यात]] व [[दमण व दीव]]<ref>गोवा, दमण व दीव भाषा कायद्यानुसार कोकणी ही एकमेव राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या व्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते.[http://nclm.nic.in/shared/linkimages/35.htm ४२वा अहवाल- जुलै २००३-०४] pp. para 11.3</ref>, [[दादरा व नगर हवेली]]<ref>[http://dnh.nic.in/deptdoc/vguide.pdf दादरा व नगर हवेली प्रशासनाचे माहितीपत्रक]</ref> या केंदशासीत प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
 
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)<ref>[http://www.unigoa.ac.in/department.php?adepid=8 गोवा विद्यापीठ- मराठी विभाग]</ref>, महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)<ref>[http://www.msubaroda.ac.in/departmentinfo.php?ffac_code=1&fdept_code=11 महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा]</ref>, उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश)<ref>[http://www.osmania.ac.in/Arts%20College/Marathi.htm उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद]</ref>, गुलबर्गा विद्यापीठ<ref>[http://www.gulbargauniversity.kar.nic.in/deptmarathi.htm गुलबर्गा विद्यापीठ]</ref>, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)<ref>[http://www.dauniv.ac.in/rules/statute.doc देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर]</ref> व जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (नवी दिल्ली)<ref>[http://www.jnu.ac.in/main.asp?sendval=SchoolOfLanguage जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली]</ref> येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत.
 
 
== मराठी भाषेचा इतिहास==