"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३४ बाइट्स वगळले ,  १३ वर्षांपूर्वी
 
भारतात मराठी मुख्यत्वे [[महाराष्ट्र]] राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर [[गोवा]], [[कर्नाटक]], [[गुजरात]], [[आंध्र प्रदेश]], [[मध्य प्रदेश]], [[तामिळनाडू]] व [[छत्तीसगढ]] राज्यात आणि [[दमण व दीव]], [[दादरा आणि नगर हवेली]] या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- [[बडोदा]], [[सुरत]], दक्षिण गुजरात व [[अहमदाबाद]] (गुजरात राज्य), [[बेळगांव]], [[हुबळी]]- धारवाड, [[गुलबर्गा]], [[बिदर]], उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), [[हैद्राबाद]] (आंध्र प्रदेश), [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]] (मध्य प्रदेश) व [[तंजावर]] (तामिळनाडू)
 
मराठी प्रथम भाषा असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील सतरावी व भारतातील चौथी भाषा आहे. महाराष्ट्र व गोव्याव्यतिरिक्त मराठी [[बेळगांव]], [[हुबळी]]-धारवाड, [[बिदर]], [[इंदूर]], [[ग्वाल्हेर]], [[बडोदा]], [[हैद्राबाद]], [[तंजावर]] येथेदेखील बोलली जाते. भारताबाहेर [[इस्त्राएल]] व [[मॉरिशस]] या देशातसुद्धा मराठी भाषक आहेत. मराठी माणंसे [[युरोप]]-अमेरिकेसह जगभर पसरली आहेत.
 
== मराठी भाषेचा इतिहास==