"मानस राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
मानस राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यातील भारत- भूतान सीमेवरील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे येथील [[सोनेरी वानर]] व ढगाळ बिबट्या ज्याला इंग्रजीत Clouded Leopard असे म्हणतात.यातील सोनेरी वानर जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याच बरोबर अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पतींसाठी हे माहेरघर आहे. या उद्यानाचे नाव येथील वाहणार्‍या मानस नदीमुळे पडले आहे. [[मानस नदिनदी]] [[ब्रम्हपुत्रा नदी|ब्रम्हपुत्रा नदीची]] एक प्रमुख उपनदी आहे.
 
या उद्यानाची स्थापना १९२८ मध्ये झाली व याचे क्षेत्रफळ ३६० किमी वर्ग इतके आहे. याची १९७३ मध्ये [[व्याघ्रप्रकल्प]] म्हणून घोषणा झाली. १९८५ मध्ये युनेस्कोतर्फे या उद्यानाची [[जागतिक वारसा ठिकाण]] म्हणून निवड करण्यात आली, मुख्य कारण म्हणजे केवळ येथेच आढळणारे प्राणी व पक्षी. राष्ट्रीय उद्यान असले तरी सीमेवर असल्यामुळे चोरट्या शिकारीचा तसेच दहशतवाद्याचा उपद्रव खुप आहे.
 
==प्राणी ==
 
वर नमूद केल्या प्रमाणे येथे आढळणारे [[सोनेरी वानर]] येथील मुख्य आकर्षण आहे त्याच बरोबर भारताचा प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]] असुन भारतातील महत्त्वाच्या [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] प्रजाती येथे आढळतात. [[वाघ]], [[बिबट्या]], [[ढगाळ बिबट्या]] व अनेक प्रकारच्या [[रानमांजर|रानमांजरी]] ज्यातील [[सोनेरी मांजर]] जे अतिशय दुर्मिळ आहे. भारतातील मार्जार कुळातील सर्वात अधिक प्रजाती येथे आढळून येतात<ref>आपली सृष्टी आपले धन भाग -४ सस्तन प्राणी, निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे </ref>.
 
एकुण सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती येथे आढळून येतात, पक्ष्यांच्या ३८०, सरपटण्यार्‍या प्राण्यांच्या ५० प्रजाती येथे आढळून येतात. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये [[भारतीय हत्ती]], [[भारतीय एकशिंगी गेंडा]], [[गवा]], [[रानटी म्हशी]], [[बारशिंगा]], आसामी माकड, स्लो लोरिस, पाणमांजरी, अस्वले, भेकर, सांबर, चितळ इत्यादी. सोनेरी वानरा बरोबरच, आसामी कासव व छोटे रानडुक्कर येथील वैश्यिठ्यवैशिठ्य आहे.
 
==संदर्भ==
<references/>