"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
श्री साईबाबांचे ओरिजनल छायाचित्र अपलोड केले असून हे मूळ अस्सल कृष्णधवल छायाचित्र विश्वातील सर्व साईभक्तांच्या दर्शनार्थ ऋषिक चंद्रचूड आणि बाबासाहेब गायकवाड यांच्या सौजन्याने प्रसिद्ध केले आहे.
श्री साईबाबांच्या महानिर्वाणानंतर जन्मलेल्या जन्मस्थानाची सत्य माहिती योग्य संदर्भांसह जोडली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. विशेषणे टाळा दृश्य संपादन
ओळ १७:
[[१५ ऑक्टोबर]] [[इ.स. १९१८|१९१८]] रोजी [[दसरा|दसऱ्याच्या]] दिवशी श्री साईबाबांनी शिर्डीत महासमाधी घेतली.{{संदर्भ हवा}} बाबांच्‍या कृपेने आजही भक्‍तांना अनुभव येतो. त्‍यामुळे बाबांप्रती भक्‍तांची निष्‍ठा व सबुरी निर्माण होते. बाबांचे दरबारी आलेल्‍या भक्‍ताच्‍या सर्व व्‍यवहारी अपेक्षा, मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोहोचतात व ते त्‍या पूर्ण करतात. कोणीही बाबांचे दरबारातून रिकाम्‍या हाताने परत जात नाही अशी सर्व सामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
 
== श्री साई महानिर्वाणानंतर जन्मलेले जन्मस्थान ==
== जन्मस्थानाचा वाद ==
श्री साईबाबांच्या हयातीत त्यांच्या जन्मस्थानाचा, मातापित्यांचा तसेच धर्म आणि पंथांचा शोध कोणास लागला नाही. स्वतः श्री साईबाबांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. श्री साईबाबांच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या संतकवि दासगणू महाराजकृत ग्रंथ भक्तिलीलामृत वर्ष १९०६ शके १८२८ तसेच संतकथामृत वर्ष १९०८ शके १८३० या दोन्ही ग्रंथात तसेच समकालीन महत्वपूर्ण दस्तऐवजांमध्येही बाबांच्या जन्मस्थानाबाबत कोणताच उल्लेख आढळून येत नाही. सर्व साईभक्त ज्या ग्रंथास प्रमाण मानतात त्या श्री साईसच्चरित ग्रंथातसुद्धा श्री साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणताच उल्लेख सापडत नाही. श्री साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत सर्वप्रथम उल्लेख हा १९२५मधे प्रसिद्ध झालेल्या श्री साईलीला वर्ष ३रे चैत्र शके १८४७ अंक १ला मधील स्फुटविषय<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sai.org.in/sites/default/files/SAILEELA1925_1-30.pdf|title=SHRI SAILEELA YEAR 3 CHAITRA SHAKE 1847 ISSUE 1 (1925)|date=1925|url-status=live}}</ref> या सदरात आढळून येतो पण, या विषयीचा उल्लेख भक्त म्हाळसापती यांनी स्वतः सांगितलेल्या बाबांबद्दलच्या अनुभवात आढळून येत नाही हे विशेष. त्याच वर्षी प्रकाशित झालेल्या दासगणू महाराजकृत भक्तिसारामृत ग्रंथात श्री साईबाबांच्या गुरूंचा आणि त्यांची जन्मकथा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख अध्याय २६ मध्ये आढळतो. पण बी व्ही नरसिंह स्वामी यांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार फक्त भक्तलीलामृत या ग्रंथातील केवळ ३ अध्याय बाबांसमोर वाचून दाखवण्यात आले होते. म्हणून भक्तलीलामृत वगळता संतकथामृत, भक्तिसारामृत हे ग्रंथ बाबांच्या समोर वाचून दाखवण्यात आलेले नाहीत. ज्या ग्रंथात बाबांच्या गुरूंची व बाबांची जन्मकथा आढळते तो भक्तिसारामृत ग्रंथ देखील श्री साईंच्या महानिर्वाणानंतर लिहला गेला आहे. श्री साईसच्चरित ग्रंथ देखील अध्याय ५३ ओवी १७९ अनुसार सन १९२२, शके १८४४ मधील चैत्रमासी लिहण्यास प्रारंभ होऊन सन १९२९ शके १८५१मधील जेष्ठमासात पूर्ण झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sai.org.in/sites/default/files/sai-charitra-marathi-adhyay-53.pdf|title=SHRI SAI SATCHARITRA MARATHI ADHYAY 53|last=DABHOLKAR|first=GOVIND RAGHUNATH|url-status=live}}</ref> दासगणू महाराज ज्या गोपाळराव महाराजांना बाबांचे गुरू असू शकतील असे संबोधतात, ते बाबांचे गुरू असूच शकत नाहीत असे प्रतिपादन कथित साईजन्मस्थानाचा शोध लावणारे वि.बी.खेर आपल्या साईबाबा ऑफ शिरडी या पुस्तकात करतात. तसेच दासगणू महाराज यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बाबांचे गुरू एखादे सुफी फकीर असावेत असे मत द इटर्नल साक्षी या प्रकरणात ते व्यक्त करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books/about/Sai_Baba_of_Shirdi_English.html?id=xQccAAAAIAAJ&redir_esc=y|title=Sai Baba of Shirdi (English)|last=Kamath|first=M. V.|last2=Kher|first2=V. B.|date=1991|publisher=Jaico Publishing House|isbn=978-81-7224-030-1|language=en}}</ref> श्रीपादवल्लभचरित्रामृत ग्रंथातही बाबांचा जन्म पाथरीत झाला असे लिहले गेले असले तरी पाथरी हे बाबांचे जन्मस्थान म्हणून सर्वप्रथम प्रकाशझोतातच १९२५ साली साईलीला या मासिकातून जगापुढे आले. भक्तिसारामृतकार दासगणू महाराज आणि महाराजांचे अनुभव तसेच साईसच्चरिताचा उपोद्धात लिहणारे काकासाहेब दीक्षित यांच्या कल्पनेतून श्री साईबाबा हे पाथरीच्या ब्राम्हण कुटुंबात जन्मले आहेत असा समज पसरवून देणारे लिखाण सुरु झाले. त्यास पुढील काळात अनेकांनी उचलून धरले. परंतु, १९२५ आधी श्री साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असावे याबाबत कुठे पुसटसाहि उल्लेख आढळत नाही. जून २०१४ मध्ये द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य असलेले जगद्गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी श्री साईबाबांच्या पूजेला आपला विरोध दर्शवला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/indore/swaroopanand-saraswati-tender-apology-before-mphc-for-controversial-statement-against-shirdis-sai-baba/articleshow/49089835.cms|title=Swaroopanand Saraswati tender apology before MPHC for controversial statement against Shirdi’s Sai Baba|date=2015-09-24|issn=0971-8257}}</ref> या विधानाने प्रेरित होऊन साईबाबा हे चांदमिया असून त्यांची पूजा करू नये अशी निरालस आणि तथ्यहीन वक्तव्य करून श्री साईबाबांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. श्री साईबाबा हे नानासाहेब पेशवे आहेत अशा आशयाचे लिखाणही श्री साईबाबांच्या बाबतीत झाले. परंतु साईभक्त हा मुळातच सकलमताचा आदर करणारा असल्याने अशा अनेक अफवा पचवून तो साईबाबांच्या भक्तीपथावर श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पुढे नेत मार्गक्रमण करत आहे. श्री साईबाबांची नोंद तत्कालीन सरकारी कागदपत्रात अवलिया अशी सापडते. त्याहून महत्वाची गोष्ट अशी की त्याकाळी गुप्तहेर खाते आणि अधिकार्यांनी श्री साईबाबांचे मूळ अज्ञात असल्याचे साईकालीन रिपोर्ट आणि ऑर्डरमध्ये स्पष्ट केले आहे. " जन्म बाबांचा कोण्या देशी । अथवा कोण्या पवित्र वंशी । कोण्या मातापितरांच्या कुशी । हे कोणासी ठावे ना ।। " या श्री साईसच्चरितातील अध्याय ४ मधील ११३व्या ओवीत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sai.org.in/sites/default/files/sai-charitra-marathi-adhyay-04.pdf|title=SHRI SAI SATCHARITRA MARATHI - ADHYAY 4|last=DABHOLKAR|first=GOVIND RAGHUNATH|url-status=live}}</ref> उल्लेख केल्या प्रमाणे बाबांच्या जन्माबाबत कुठेही कोणतीच खात्रीलायक माहिती सापडत नाही.
साईबाबांच्या जन्मस्थळा विषयी सध्या वेगवेगळी मते मतांतरे आहेत. साईबाबांच्या जन्माविषयी जगभरातुन दावे करण्यात आलेले आहेत. मात्र सर्वमान्य व प्रमाणीत पुरावे सादर करण्यात सर्वांनाच अपयश आलेले आहे. मुळात साईबाबांनी कधीही स्वतःच्या जन्म स्थळाबाबत कुठे उल्लेख केल्याचे आढळून येत नाही.{{संदर्भ हवा}}
 
साईबाबा हे मुस्लिम फकीर नसून ते जन्माने ब्राम्हण होते, त्यामुळे ते हिंदूच आहेत. असा दावा कांदिवलीच्या साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने सप्टेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल केला होता.{{संदर्भ हवा}} त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरी या गावात २७ सप्टेंबर १८३७ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या आईवडिलांनी बालपणी त्यांना मुस्लिम फकिराने केलेल्या आग्रहावरून त्यांच्या हवाली केले. पण नंतर त्या फकिराने साईबाबांना वेकुंशा नावाच्या हिंदू गुरूकडे सोपवले. साईबाबा यांचे खरे नाव हरिभाऊ आहे. याबाबत सबळ पुरावे असल्याचा दावाही साईधाम चॅरिटबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे.{{संदर्भ हवा}}
 
== श्री साईबाबांची समकालीन सरकारी दस्तऐवजांमधील नोंद ==
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले