"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
श्री साईबाबांचे मूळ अज्ञात असल्याचा उल्लेख असलेली ऑर्डर जोडली.
रिपोर्टच्या लिंक तसेच सर्व्हेचे संदर्भ जोडले.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २४:
== श्री साईबाबांची समकालीन सरकारी दस्तऐवजांमधील नोंद ==
[[चित्र:Collector C.A. Beyts's Order on Date 24th October 1918 Published in Sainath Prabha Magazine in November 1918 issue.jpg|अल्ट=ब्रिटीश दस्तऐवजात श्री साईंचे मूळ अज्ञात असल्याचा उल्लेख.|इवलेसे|२४ ऑक्टोबर १९१८ रोजी तत्कालीन कलेक्टरद्वारे दिलेल्या ऑर्डर मध्ये श्री साईंचे मूळ अज्ञात असल्याचा उल्लेख.]]
श्री साईबाबांच्या काळात तत्कालीन ब्रिटीश सरकारने सर्वप्रथम आपल्या अहमदनगर कलेक्टरेट सर्व्हेमध्ये तसेच विकली रिपोर्टस ऑफ क्रिमिनल इंटेलिजन्स ऑन पॉलिटीकल सिचूएशन या महत्वपूर्ण दस्तऐवजांमध्ये श्री साईबाबांची नोंद केलेली आहे. श्री साईबाबांना तत्कालीन लोक आपापल्यापरीने साधू, अवतार, फकीर तसेच अवलिया मानत असे महत्वपूर्ण निरीक्षण या दस्तऐवजात पाहण्यास मिळते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianculture.gov.in/archives/weekly-reports-director-criminal-intelligence-political-situation-during-january-1911|title=Weekly Reports of the Director of Criminal Intelligence on the Political Situation, during January 1911|website=INDIAN CULTURE|language=en|access-date=2023-04-11}}</ref> क्रांतिकारक श्री. गणेश श्रीकृष्ण खापर्डे, सन्मानीय श्री. हरी सीताराम दीक्षित, पूर्वी खान्देशात असलेले भाटे नावाचे एक मामलतदार, श्री. चांदोरकर ( त्याकाळचे उपजिल्हाधिकारी आणि कोपरगावचे माजी मामलतदार) ई. अशा उच्चशिक्षित साईबाबांच्या भक्तांची नोंद या दस्तऐवजांमध्ये केलेली आढळून येते. तसेच बाबांनी कोणत्याही उपासनापद्धतीचा अवलंब केला नसल्याचेही यात नमूद केले आहे. हे तीन रिपोर्ट जानेवारी सन १९११, जुलै सन १९१२ तसेच ऑगस्ट सन १९१२ मध्ये लिहले गेले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianculture.gov.in/node/2689179|title=Weekly Reports of the Director, Criminal Intelligence, on the Political Situation, during August 1912|website=INDIAN CULTURE|language=en|access-date=2023-04-11}}</ref> याहून आधी अहमदनगर कलेक्टरेटच्या कोपरगाव सेकंड सेटलमेंट सर्व्हे मध्ये श्री साई अवलिया फकिरांच्या सन्मानार्थ सुरू झालेल्या उरुसाची पार्श्वभूमी आणि त्याचे महत्व अधोरेखित होते. हा सर्व्हे सन १९०७ साली पूर्ण झाला होता.<ref>{{स्रोत पुस्तक|title=PAPAERS RELATING TO THE SECOND REVISION SURVEY SETTLEMENT OF THE KOPARGAON TALUKA OF THE AHMEDNAGAR DISTRICT|publisher=SELECTIONS FROM THE RECORDS OF THE BOMBAY GOVERNMENT|year=1907|location=BOMBAY PRINTED AT THE GOVERNMENT CENTRAL PRESS|pages=10}}</ref> तसेच बाबांच्या महासमाधीनंतर २४/१०/१९१८ रोजी कलेक्टर सी.ए.बेट्स यांनी हरी सीताराम दीक्षित यांच्या पत्रावर उत्तर देताना दिलेल्या ऑर्डर मध्ये श्री साईबाबांचा मोहम्मदन ऑफ अननॉन ओरिजिन असा उल्लेख करून बाबांचे मूळ अज्ञात असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून तत्कालीन ब्रिटिश गुप्तहेर आणि अधिकाऱ्यांनाही श्री साईबाबांचे मूळ शोधता आले नाही. या तत्कालीन आणि सरकारने केलेल्या दस्तऐवजातून मिळालेल्या नोंदी श्री साईबाबांबद्दल महत्वपूर्ण आणि खात्रीलायक माहिती देतात.
 
== कार्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले