"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो भोसले - जाधव घराण्याचे वैर याविषयी शिवकालीन ग्रंथ " श्री शिव भारत " मध्ये नमूद असलेला प्रसंग मी येथे माझ्या शब्दात मांडला आहे. आणि संदर्भ म्हणून माझ्या वेबसाईटची लिंक ज्यामध्ये मी हा प्रसंग संदर्भ/ पुरावे सह लिहिला आहे. आणि श्री शिव भारत या ग्रंथाला देखील संदर्भ म्हणून ठेवला आहे.
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४७:
 
== भोसले व जाधवांचे वैर ==
[https://unchbharari.com/chhatrapati-shivaji-maharaj-information-in-marathi/ लखुजीराव] जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला.
पुढे [[लखुजी जाधव]] व [[शहाजीराजे भोसले]] यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव [[लखुजी जाधव]] यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले [[शहाजीराजे भोसले]] यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/227.html|title=राजमाता जिजाबाई|दिनांक=2010-07-04|संकेतस्थळ=बालसंस्कार|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले.
 
आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.
 
या प्रकरणानंतर भोसले - जाधव यांच्यात वैर निर्माण झाले.आणि जिजाऊ आऊसाहेबांचे माहेरपण कायमसाठी बंद [[श्रीशिवभारत|झाले]].
 
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२९}}</ref> नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण [[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी राजांत]] पुरेपूर उतरला होता.