"भुलेश्वर मंदिर (माळशिरस)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
 
==दौलतमंगल किल्ला आणि मंदिरांचा जीर्णोद्धार==
१६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू [[ब्रह्मेंद्रस्वामी]] यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. [[ब्रह्मेंद्रस्वामी|ब्रह्मेंद्रस्वामींनी]] माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथीभूमिज
-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
 
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.