"लिओनार्दो दा विंची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बालपण: fgvybvqytevtehbqgtbqtgqevf
ओळ २६:
}}
'''लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स (प्रबोधन
)'''काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. [[मोनालिसा]], [[द लास्ट सपर]], [[मॅडोना ऑफ द रॉक्स]] ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत.''' चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्दो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राऊन या लेखकाने नुकतीच '[[दा व्हिंची कोड']] या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.'''
 
== बालपण ==