"सोपानदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२:
रात्री देहूकर फडाचे कीर्तन होते . त्यानंतर खिरापत व शेजारती होते त्यानंतर रात्री कुसमाडी, ता.येवला, जि.नाशिक दिंडीचा जागर होतो .
वद्य त्रयोदशी – हा सोपानदेवांच्या समाधीचा दिवस आहे . या दिवशी मुख्य मंडपात सकाळी ९ ते १२.३० सोपानदेवांच्या समाधी वर्णनाचे कीर्तन होते . दुपारी १२ वाजता समाधी वर्णनाचा अभंग होऊन श्रींवर गुलाल व पुष्पवृष्टी होते .समाधी वर्णनाचे कीर्तन पूर्वी वहिवाटदार गोसावी घराण्यातील व्यक्ती करत . यामध्ये वै. ह.भ.प. ज्ञानेश्वर वामन गोसावी, वै. ह.भ.प. दत्तोबा ज्ञानेश्वर गोसावी, ह.भ.प.नारायण दत्तात्रेय गोसावी यांनी ही कीर्तनसेवा केली आहे. आता ही कीर्तनसेवा नामदेवरायांचे विद्यमान वंशज – ह.भ.प. केशव महाराज नामदास करतात .
यानंतर लगेच काल्याचे कीर्तन होते. ही सेवा भोपळे दिंडीकडे असून गेली अनेक वर्ष ह. भ. प. लक्ष्मण महाराज कोकाटे भोपळे दिंडीतर्फे ही सेवा करतात. काल्याचे कीर्तन झाल्यावर दिंडी निघते. दिंडी चिंचेच्या झाडाखालील पादुकांपाशी आल्यावर दहीहंडी फोडली जाते. नंतर दिंडी नदीपलीकडील पुंडलिक मंदिरापाशी जाऊन भागीरथी कुंडावर येते. इथे कृष्णलीलेचा अभंग होऊन वारकरी पताकांनी (वारकरी जयेश झेंडा ) एकमेकांवर पाणी उडवतात. येथे आरती होऊन दिंडी मंदिरात येते . मुख्य मंडपात विनवणीचा अभंग होऊन आरती होते. यानंतर मंदिरात महाप्रसाद होतो. पूर्ण मंदिरात पंगती बसतात.
रात्री चिंचेच्या झाडाखालील पादुकांपाशी दिव्यांची आरास करतात. यावेळेस महिन्याचे वारकरी सोपानदेवांच्या समाधी वर्णनाचे अभंग म्हणतात. त्यानंतर शेजारती होते. या दिवशी रात्री कीर्तन होत नाही.
वद्य चतुर्दशी – हा यात्रेचा शेवटचा दिवस . या दिवशी काकडा झाल्यावर लगेच पूजा होत नाही . त्या आधी मंदिर धुऊन काढतात . नंतर पवमान अभिषेक होतो . या नंतर सकाळी ११ च्या सुमारास समाधीस सर्वांना गरम पाणी घालता येते . या वेळेस समाधीस लिंबू साखर सुद्धा लावतात . यास प्रक्षाळ पूजा अथवा लिंब न्हाण असेही म्हणतात
"https://mr.wikipedia.org/wiki/सोपानदेव" पासून हुडकले