"बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला [[नवजात शिशु|नवजात अर्भक]] (Infant) म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. त्याचे वय २८ दिवसांचे होईपर्यंत नवजात म्हणतात. २८ दिवसांपासून ३ वर्षांपर्यंत बाल्यावस्था आणि ३ ते १६ वर्षांपर्यंत किशोरावस्था म्हणतात.
[[चित्र:HumanNewborn.JPG|250px|thumb|right|नवजात अर्भक- बाळ]]
==== नवजात अर्भकाचे श्वसन व रक्ताभिसरण ====
जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. श्वसनाचा मार्ग साफ होऊन मूल जन्मल्यावर प्रथम रडते. तेव्हा श्वसन स्वतंत्रपणे सुरू होते.
*पहिल्या रडण्यानंतर शांत झालेल्या मुलाचा श्वसनाचा दर प्रत्येक मिनिटाला ३० ते ४० इतका असतो. त्यात अनियमित लय असू शकते.
ओळ ९:
*श्वसनक्रियेत जर काही दोष असेल तर श्वसनाच्या वेळी बाळाच्या नाकपुडया फुलतात, छातीच्या फासळया आत ओढल्या जातात(Grunting) आणि हनुवटी व मान वर खाली होते.
*श्वसनात जास्त गंभीर दोष असेल तेव्हा श्वास सोडताना बाळ कण्हते.
 
==== नवजात अर्भकाची विष्ठा ====
बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर ४८ तासांपर्यंत कधीही असू शकते. ४ ते ५ दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून १२-१५ वेळा शी करतात. याउलट काही बाळे ४ ते ७ दिवसात एकदाच शी करू लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ" पासून हुडकले