"ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{माहितीचौकट संरक्षित क्षेत्र
|चित्र = Tadoba sambar.jpg
|चित्र_वर्णन = ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील सांबर
|नाव = ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
|इतर_नाव = ताडोबा राष्ट्रीय उद्यान
ओळ १५:
|दुवा = {{URL|mahatadobatiger.com|mahatadobatiger.com}}
}}
'''ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प''' महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा [[ताडोबा राष्ट्रीय उद्यान|ताडोबा अभयारण्याचे]] ११६.५५ कि.मी. क्षेत्र व [[अंधारी अभयारण्य|अंधारी अभयारण्याचे]] ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे.
महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे. येथे एकूण चार बफर झोन आहेत. या प्रकल्पालगतचे सुमारे ११०१.७७ चौ.कि.मी. क्षेत्र त्यात येते. त्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा असा त्यामागील हेतू आहे.
'''ताडोबा राष्ट्रीय उद्यान''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील प्रमुख [[राष्ट्रीय उद्यान]] असून ते [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्हयात]] आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या [[मगर|मगरी]]-[[सुसर|सुसरी]] आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.
काही काळापूर्वी या उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तिकरण होऊन त्याचे नाव [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प]] झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे.
==व्युत्पत्ती==▼
आजमितीस (सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे [[वाघ|वाघांचे]] आकर्षणही वाढले आहे. सध्या उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर [[बिबट्या]] , [[अस्वल]] , जंगली कुत्री अथवा [[कोळसून]] , [[तरस]] , [[उदमांजर]] आणि विविध प्रकारच्या [[रानमांजर | रानमांजरी]]. हरणांच्या जातीत, [[नीलगाय]] , [[सांबर]] , [[चितळ]] , [[भेकर]], कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी [[पिसुरी]] नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते<br /><br />इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, [[गरुड]], [[करकोचा|करकोचे]], [[बगळा|बगळे]], ससाणे, रानकोंबड्या, [[धनेश]], भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, [[मोर]] हे त्यापैकी काही.<br /><br />ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. [[साग]], [[बांबू]], ऐन, हलई, धावडा, बिबळा, [[तेंदू]], [[मोहा]], [[खैर]] अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.<ref>आपली सृष्टी आपले धन भाग.
==पाणी==
ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात एकूण छोटे मोठे अनेक तलाव आहेत. त्यांपैकी ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत.
[[अंधारी नदी]]ला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. [[अंधारी नदी]]च्या प्रवाहात वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत.
या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नालेसुद्धा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा आंबा, चिखलवाही, सांबर डोह, कासरबोडी, जांबून झोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हेही वॉटर होल ताडोबा जंगलात आहेत.
==पुस्तके==
* ताडोबाच्या जंगलात (बालसाहित्य, डाॅ. [[अरुणा ढेरे]])
* ताडोबा : वाघांचे जंगल (अतुल धामनकर)
* वनराजाला भेटायला ! चला जाऊ या ताडोबाला ! (चित्रमय पुस्तक, प्रकाशक - विद्या विकास पब्लिशर्स)
▲==व्युत्पत्ती==
ताडोबा आणि अंधेरी प्रदेशातील घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांनी पूजेच्या वेळी ताडोबा किंवा ताडो या देवतांचे नाव 'ताडोबा' असे घेतले जाते तर 'अंधेरी' म्हणजे [[आंध्र नदी]]चा उल्लेख होय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.sanctuaryasia.com/index.php?option=com_content&view=article&id=568&Itemid=192Tadoba-andhari|title=संग्रहित प्रत|access-date=2018-06-06|archive-date=2019-08-14|archive-url=https://web.archive.org/web/20190814185925/https://www.sanctuaryasia.com/index.php?option=com_content&view=article&id=568&Itemid=192Tadoba-andhari|url-status=dead}}</ref>
==पर्यटक माहिती==
ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक सह खुल्या टॉप जीप आणि बसेस अभ्यागतांसाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणीही मुक्काम उपलब्ध आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.amazingmaharashtra.com/2012/10/tadoba-national-park.html}}</ref>
Line ३४ ⟶ ४९:
==वाघांची संख्या==
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख भागात सुमारे ६० व बफर झोन (प्रत्यारोधी क्षेत्र){{मराठी शब्द सुचवा}} यात सुमारे १५ वाघ आढळले आहेत.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कॉंझर्वेशन ट्रस्ट तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.{{संदर्भ हवा}}
==संदर्भ==
|