"सारस क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sarus Crane (Grus antigone) at Sultanpur I Picture 151.jpg|thumb|सारस क्रौंच जोडी]]
'''सारस क्रौंच''' अथवा नुसताच सारस (शास्त्रिय नाव :Grus antigone) भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा [[क्रौंच]] आढळुन येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहेमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडिदार पसंत करतात. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान , उंच पाय व डोके व चेहरा डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते. उंची साधारणपणे ५ फुटाच्या आसपास असते. इतर क्रौंचाप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे.
 
 
ओळ १२:
भारतीय संस्कृतीमध्ये या पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते कि वाल्मिकी ऋषींना सारस क्रौंचाच्या जोडिकडे पाहुन पहिले काव्य सुचले व रामायणाची निर्मिती झाली. आयुष्य एकाच जोडिदारबरोबर पक्षी व्यतीत करत असल्याने तसेच विणीच्या हंगामात जोडी अत्यंत मोहक असा प्रणयनृत्य करतात. त्यामुळे या पक्ष्यांना प्रेमाचे प्रतिक मानतात. राजस्थान मध्ये या पक्ष्याचे स्थान अतिशय मानाचे असल्याने याची शिकार करत नाहित. असे मानतात कि या पक्ष्याची शिकार केली तर त्याच्या अथवा तिचा जोडिदार झुरुन प्राण त्यागतो त्यामुळे याच्या शिकारीचे पाप अत्यंत मोठे आहे.
 
[[वर्ग:पक्षी]]
 
 
[[de:Saruskranich]]