"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2401:4900:1C9B:149A:1A5:45F:14DE:7CFC (चर्चा)यांची आवृत्ती 2218520 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
2401:4900:1C9B:149A:1A5:45F:14DE:7CFC (चर्चा)यांची आवृत्ती 2218505 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८:
 
आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ [[मराठी]] भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी काव्य आणि [https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 '''निबंध'''] लिहिले आहेत. [[रामायण]]ातील महानायक [[श्रीराम]]चंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी [[अयोध्या]] श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक [https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 कविता] रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी [[यशवंत]] यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
 
आई ललित: समृद्ध शब्दाविष्कार...
 
आज वाशीम- अमरावती रेल्वे प्रवासात नरेंद्र नाईक यांचे आई (ललित) वाचले. वाचताना दंग झालो. आई विषयी कित्ती कित्ती भावुक होऊन लिहिले? यातून लेखकाच्या मनात  स्वतःच्या दिवंगत आई बद्दल किती‌, कशी अपार करूणा, ओढ, ऋजुता आहे. हे लक्षात येते. खरे म्हणजे ललित स्वरूपाचे कोणतेही लेखन लेखकाच्या जीवन दर्शनाचा कधी स्पष्ट तर  कधी अर्धस्पष्ट असा आत्माविष्कारच असतो. ती संधी या निमित्ताने नरेंद्र नाईकांनी नक्कीच घेतली असणार. ही विचारण्याची बाब नव्हे. आई म्हणजे विविध भाषा भगीनीच्या सहबंधातून सायासा प्रयासाने साकारलेला स्नेहपुर्ण सुवर्ण कुंभच साक्षात. वाचताना वेळोवेळी वाड़मय विश्वविख्यात ग्रेटेस्ट, गेय, गजबकार, कवीराज मानिक गोडघाटे उर्फ ग्रेसच्या लाघवी, लयदार, लौकिक अर्थाने ललित लेखाची उस्फुर्तपणे उजळणी करतो की, काय असे उगीच्या उगीच वाटते. पण... व्यक्त होताना ठिक ठिकाणी लेखक कधी हळवा झाला असणार, कधी अस्वस्थ झाला असणार, तर कधी कमालीचे चंचल झाला असणार. कथा, कादंबरी लिहिताना विविध पात्रांच्या माध्यमातून आपण जेंव्हा वेगवेगळे प्रसंग चितारतो; तेंव्हा त्या त्या प्रसंगातून व्यक्त होणारे भाव लेखक म्हणून आपल्याला भोगावे लागतात. हे कादंबरीकार म्हणून नरेंद्र नाईकांना ज्ञात आहे. मी या आधी लेखकाच्या कादंबऱ्या वाचल्या. त्यावर भाष्यही केले. शब्दाविष्काराची सुलभता, सुगमता हे तिथलं लेखकाचं एक खास वैशिष्टय होतं. इथे मात्र लेखक नरेंद्र नाईक यांनी  वेगळीच शैली आविष्कृत केली आहे. संस्कृत, प्राकृत, मराठी, हिंदी, फारसी, उर्दू अशा विविध भाषा भगिणींच्या हाती हात देऊन भाषेचे अनवट रंग उत्फूर्तपणे शब्दावकाशात मुक्त हस्ते उधळले आहेत. हे सर्व अथपासून इतिपर्यंत सहज करणे हे माझ्या सारख्याला कदापिही ना अवगत होणारी बाब आहे. ते लेखकांनी अगदी लीलया पार पाडलय. यासाठी लेखक नरेंद्र नाईक यांचे मनापासून कौतुकचं करावे लागेल. आईसाठी उपमा, उत्प्रेक्षा, रूपके, प्रतिमा, प्रतीके यांची अक्षरशः लयलूट केली आहे. केवळ पासष्ट पाने, त्यात आठ लेख आणि त्यातील आई विषयक विविध प्रकारची विधाने याची एखाद्या उत्सुक वाचकांने मोजदाद केली तर... तो थकल्या शिवाय राहणार नाही. आई विषयी आज पर्यंत अनेकांनी कथा, कविता, कादंबरी,  लेख यातून लिहिले आहे. पण नरेंद्र नाईकांची सर त्यापैंकी कोणालाही येणार नाही. एखादं दोन उदाहरणच घेऊ. पहा. कवी यशवंत म्हणतात,
 
"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी."
 
किती साधे शब्द? त्यात ना लालित्य, ना लक्षवेधी शब्दकळा. दुसरं उदाहरण घ्या फ. मुं. शिंदेचं. ते म्हणतात,
 
"आई एक गाय असते"
 
वगैरे वगैरे. त्यांच्या या कवितेत गायच्या जागी कितीतरी वेगवेगळे शब्द ठेवून ही कविता हवी तितकी लांबवता येते.
 
(हे आपलं माझं मत. त्याबद्दल फमुंची क्षमा मागायची लाज वाटणार नाही.) अर्थात कवितेला कांही मर्यादा असतात. हे लक्षात घेऊन सुद्धा नरेंद्र नाईकांची आई काकणभर सरस ठरते. नमुन्या दाखल एखाद्या उताऱ्यातील कांही पल्लेदार वाक्ये निवडू.
 
"आई असते नभोमंडपातील जागता दिवा. निबीड अंधकारात तेजाळणारा ध्रुवतारा. म्हणून ती असते नंदादिपात निमग्न. नादब्रह्म असतात शब्दब्रम्हाच्या सरी. विनय असतो नवलपरी. म्हणूनच पडघम वाजतात दिपमंजीरी. द्वेत-अद्वेत भावाच्या द्विधा मनस्थीतीत असल्या तरी निरुत्तर करते निरीश्वरवादाला. निरामय असतो तिचा पदन्यास. निरभ्र आकाशातही तेजाळतात परब्रम्ह जीवीत्वाचे जुलूस. तिची जिगीषा असते जास्वंदीच्या फुलासारखी. जयस्तंभावरची जागती ज्योत म्हणजे आई!<nowiki>''</nowiki> (लेख आठवा- रेशमी स्वप्नांचे झुले- पृष्ठ- 59- 60) प्रतिभा प्रतिभा म्हणतात ती काय असते? आणि चारी अंगांनी ती कारंज्या सारखी थुईथुई करत मनोवेधक अनेकानेक विभ्रमांनी व्यक्त होते. ही बाब वरचा उतारा सोदाहरण स्पष्ट करतो. म्हणूनच नरेंद्र नाईकांच्या उत्तुंग प्रतिभेला सलाम केल्या शिवाय राहवत नाही. कारण नरेंद्र नाईक यांची शब्द संपदा अफाट आहे. तिचा लिलया वापर केला आहे. ही बाबच थक्क करणारी आहे.
 
- बाबाराव मुसळे, वाशिम
 
<nowiki>*</nowiki>
 
मलपृष्ठ अभिप्राय-
 
नरेंद्र नाईक यांची आई ललित गद्य प्रवाहात दुर्मिळ!
 
नरेंद्र नाईक यांच्या शब्दातील आईचं अंतरंगी सौंदर्य निदान मराठी साहित्य प्रवाहात तरी दुर्मिळ दिसते. सर्व प्रतिभावंताना आईचं मातृत्व वंदनीय वाटणं स्वाभाविक असलं आणि अनेकांनी आई आपल्या शब्दात उभी केली असली तरी मातृत्वाचा गहीवर आणि तिची मुल्यांत्मकता ज्या भाषेत नरेंद्र नाईकांनी अभिव्यक्त केलीय त्या भाषेचे सौंदर्य आणि प्रत्ययकारीता प्रचंड भावणारी आहे. स्त्रीत्व आणि मातृत्वाचे सांस्कृतिक अनुबंध नैतिक अनैतिकतेच्या पुराणकालीन वास्तवासह आजच्या सांस्कृतिकतेला कवेत घेताना श्री नरेंद्र नाईक यांचे चिंतन सुक्ष्म, सखोल व व्यापकतेची अनुभूती देत रहाते. ललित गद्यातील ही काव्यात्म आई केवळ नरेन्दाची नसून ती माझी पण आहे.
 
- प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे
 
अध्यक्ष
 
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी- चिंचवड
 
अभिप्राय...
 
बासरी अबोल झाली. मी पुर्ण वाचलय. भावनेचा बांध फुटून आई प्रती असलेल्या चिंतन स्वरुपातील भावना ओसंडून वाहतात. जन्म दात्रीच ओघवत दर्शनच वाक्या वाक्यातून घडतं. आई हा मराठी साहित्यीकांच्या लेखणीचा विषय होतो, तेंव्हा वाचकांच्या मनात भावनाचे काहूर तांडव करायला लागते. साने गुरुजी, कवि यशवंत, माधव ज्युलियन, फ. मु. शिंदे, कवि वामन निंबाळकर या सारख्या साहित्यीकांच्या कृती पेक्षा आपली कृती भिन्न आहे. ललित लेख आपला मी पहिल्यांदाच वाचतो आहे. ओघवती भाषा आणि भावनेने ओथंबलेले शब्द मनाला मोहून घेतात. एकंदरीत छान भट्टी जमलीय. काही शब्द ग्रामीण जीवनातील सहज डोकावतात. खोलणे...  उघडणे.. पण याचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो. तो टाळायला हवा. हे शब्द व्यक्तीगत अनुभूतीचे आहेत. सामान्य वाचक इथे थोडा चक्रावतो. लेखन प्रवास असाच चालू ठेवा. माझ्या शुभेच्छा!
 
- नरसिंग देशमुख, देगलूर
 
<nowiki>*</nowiki>
 
विषय कोणताही असो तो वास्तवाच्या पातळीवर रेखाटताना ज्यांची लेखनी जराही कच न खाता निर्भीडपणे पुढे जाते असे लेखक श्री नरेंद्र नाईक यांचे लेखन वाचण्याचे मला कायमचं उत्सुकता असते. त्यामुळे बासरी अबोल झाली हा लेख समोर येता क्षणीच वाचून काढला आणि आवाक झाले. खरं तर आईची महती आजवर अनेकांनी वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लिहीलेली आहे. तरी सुध्दा या लेखातील आई नितांत वेगळी आहे. आई एक स्त्री आहे आणि मुलांच्या वाट्याला येणाऱ्या बाप नावाच्या पुरुषा सोबत जुळते. त्यावेळी तिचे अस्तित्व कधी कधी त्या पुरुषांच्या अधिपत्याखाली दबून जाते आणि जगण्यातील संघर्ष पेलत लेकरांना घडवणारी आई जगा समोर येतच नाही. हे वास्तव डॉ. नाईक यांनी अनेक दाखले देत अतिशय सक्षमतेने मांडले आहे. आई मधून बाप वजा केल्या नंतरही उरणाऱ्या आईची संकल्पना मला हळवे करून गेली. सध्या मी पॅरीसला ब्लुफाॅन्टन येथे आहे. सर्वांनी मला मोठ्यानी वाचायला सांगितले. घन ओथंबून आले हे वाचताच सर्वांना आश्रू आवरता नाही आले. प्रत्येकांना आपली आई आठवली. अतिशय ताकदिची प्रत्येकांनी वाचावी अशी ही आई आहे. डॉ. नाईक सर यांनी असेच लेखन करीत रहावे. त्यांच्या लिखाणाला मनपुर्वक शुभेच्छा...!
 
- प्रा. विजया मारोतकर, नागपूर
 
<nowiki>*</nowiki>
 
कादंबरीकार डॉ. नरेंद्र नाईक आपण लिहिलेले 'आई' हे पुस्तक २०१८ चे बेस्ट इंडियन बुक ठरलेले आहे. अमेझोन या विख्यात कंपनीने अशा प्रकारची नोंद केलेली असून शिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय' ही कादंबरी आणि आपली 'आई' ही कलाकृती भाग्यशाली ठरलेली आहे. आपण आमच्या परिवारातील असल्यामुळे आमच्यासाठी हा अतीव आनंदाचा क्षण आहे. आपल्या लेखनाचा जागतिक पातळीवर झालेला गौरव अभिमानास्पद आहे. आमच्याकडून आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
 
आपला स्नेहांकित
 
डॉ.जगदीश कदम, नांदेड
 
<nowiki>*</nowiki>
 
नरेंद्र नाईकांचे "आई" एक अनमोल रत्नभांडार, आईच्या आतर्म्यांचा हुंकार!
 
आई हे अफाट भावविश्व नरेंद्र नाईक यांनी आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केलाय. एका अर्थाने हिमालयाला कुशीत घेण्यापेक्षाही भव्य, दिव्य, अगम्य अनाकलनीय काम श्री नरेंद्रजी नाईक साहेबच करु शकतात. त्यांच्या लेखनीला साष्टांग दंडवत घालण्यासाठी माझे कर फार तोकडे आहेत. पण... माझ्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो की, नरेंद्र नाईक एकवीसाव्या शतकातील वि. स. खांडेकर आहेत. मी असं म्हणालो तर कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती होणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात "आई" नावाचं भावविश्व व्यापक करण्यासाठी आणि त्याच खरं स्वरूप समजून घेण्यासाठी "आई" एकदा तरी वाचावं आणि त्याची एक प्रत तरी आपल्या संग्रही ठेवावीच. आपल्या मित्र परीवाराला भेट द्यावी वाटली तर... या ग्रंथापेक्षा उच्च आणि उदात्त दुसरे काय सापडू शकणार. त्यांच्या लेखनीला आणि प्रतिभेला प्रणाम.
 
- प्रा. वसंत गिरी, मेहकर जि. बुलढाणा
 
<nowiki>*</nowiki>
 
श्री नरेंद्र नाईक, आपला "आई" हा ललित लेख संग्रह वाचला. वाचकालाही येका अनोख्या विश्वात नेणारा हा संग्रह आपापले अभिरूप घेऊन साक्षात झाला आहे आणि हे अक्षरमार्तंड आपणासमोर सहजपणे शरण आले. याचेही आश्चर्य वाटते. हंबरणारी गाय अन् हुंदडणारे वासरू यांचा अन्वय लावणे तसे अवघड. आई हे अभिव्यक्ती नि अनाभिव्यक्तीच्या पलिकडे गेलेला संबोध. या नात्याला अधोरेखित करतांना प्रतिभेचा कस लागतो. पण... या भास आभासाला आपण अक्षररूप दिलेय. हे राघवरूप वाचकालाही गुंगवून टाकणारे आहे. आईच्या अंतःकरणात प्रवेश करण्या इतपत मन नितळ झाले तरच ही "आई" आपल्याला नक्कीच  समजेल. आपल्या सृजनशीलतेला शुभकामना.
 
- देवीदास फुलारी, नांदेड
 
<nowiki>*</nowiki>
 
ऑनलाईनच्या या काळात साहित्य क्षेत्रात "आई" या पुस्तकाने गरुडझेप घेतली आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अनेक नामवंत आणि मात्तबर मंडळीनी अनेक प्रसार माध्यमातून या पुस्तकातील ललित आधीच वाचलेले आहेत आणि त्यावर व्यक्त सुद्धा झाले आहेत. एकूण आठ ललित लेख या संग्रहात आहेत. लेखांचे शिर्षकच एकदम वेगळे आणि प्रभावी आहे. मी इंथे लिहायला घेतले, मात्र अजूनही पूर्ण लेख, मी वाचले नाहीत. हे मी प्रामाणिकपणे कबुल करतो आहे. पूर्ण वाचल्या नंतर लिहायचं ठरवलं होतं, मात्र पुस्तक चर्चेचा हा समूह कांही कालावधी नंतर बंद होणार याची मला कल्पना आहे. म्हणून हा अट्टाहास. जेमतेम सुरवातीची तीन लेख वाचली आहेत आणि असे लक्षात आले की, नाईक सरांनी मराठीची प्रचंड शब्दसंपदा यात अगदीच ओतून घेतली आहे. पर्यायाने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना नवी शब्दसंपत्ती मिळाली आहे.
 
(पूर्ण वाचणार आहे निवांत. कारण हे पुस्तक घाईत किंवा वाचायचं म्हणून वाचायचं या स्वरूपाचे मुळीच नाही. भराभर वाचल्याने कांहीही कळत नाही, हेही सांगतो. समजण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचावं लागतं.)
 
शब्दांच्या या व्युहात वाचक वाहत जातो आणि हळूहळू त्याला एकेका गोष्टीचा उलगडा होत जातो. असे मला जाणवले. लेखांची अतिशय सुंदर आणि प्रभावी मांडणी केलेली आहे. मी वाचलेल्या सुरवातीच्या तिन्ही लेखात "आई" या शब्दातून, जाणिवेतून, प्रतीमेतून, प्रतिकातून, भावनेतून, संबंधातून... एकंदरीत आई या शब्दाशी जे जे जुळलेले आहे, जिथे जिथे जे जे सुचत गेले अश्या अनेक उदाहरणातून आपल्या विशिष्ट शैलीने सरांनी आई विषयीचे लेखन केले आहे. या लेखात खरेतर अथांगतेचा थांग घेतला गेला आहे, अनंताचा शोध केला गेला आहे, एवढंच मी म्हणेन आणि कदाचित म्हणूनच आज "आई" बेस्ट सेलर पुस्तक, पसंतीत अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. सलाम सर आपल्या लेखणीला.
 
- मंगेश जनबंधू , नागपूर
 
<nowiki>*</nowiki>
 
आईची अर्थात वात्सल्याची परिभाषा कधीच कोणीही करु शकणार नाही. तद्वत आपल्या "आई" लेख संग्रहातील लालित्य ही असंच न पेलवणार आहे. मला तर शंकाच आहे. ललित संग्रहातील शब्द आणि शब्दांच्या व्याप्तीला कोणी तरी पुरेपुर न्याय देऊ शकेल काय? असामान्य अशी अद्वितीय साहित्यकृती साहित्य शारदेच्या चरणी समर्पीलेलं हे पुष्प आहे. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
 
                    - कलानंद जाधव, हिंगोली
 
<nowiki>*</nowiki>
 
नाईक सर यांचा "आई" हा ललित लेख संग्रह मराठी साहित्यातील एक अप्रतिम लेणं आहे. आईच्या मांडीवर बसलेलं एक गोजिरवाणं बाळ आहे. शब्दांचा खळखळाट  करत असंख्य झरे आईची महती वर्णन करत आहेत. माय मराठीच्या गळ्यातला हा सुंदर अलंकार आईची थोरवी जणू गोड गळ्यानं गात आहे, असं वाटतं. नाईक सरांच्या लेखनीनं अशी आकाशाला गवसणी घालावी यासाठी आभाळभर शुभेच्छा!
 
- आबासाहेब घावटे, बार्शी जिल्हा सोलापूर
 
<nowiki>*</nowiki>
 
एवढा एवढा कोसला. त्यातून एका धाग्याचं तोंड हाती लागावं आणि ते उपसून घेता घेताच सलग बाराशे मीटरचं तलम रेशीम हाती लागावं आणि त्यावर सुंदर कलाकुसर करून एक नितांत सुंदर वस्त्र विणल्या जावं आणि ते परिधान केल्यानंतर बघणाऱ्याचं मन बघताक्षणीच हरखून जावं तसंच काहीसं मा. नरेंद्र नाईक यांची "आई" वाचताना झालं. इथे रेशीम किडा आणि नाईकांची आई यांच्यात मला एक समान धागा दिसतो. तो म्हणजे इतरांना सुख देण्यासाठी स्वतःचं बलिदान देणं. जोपर्यंत रेशीम किडा स्वतः कोसला विणत नाही आणि स्वतःला त्यात कोंडून घेऊन जीव सोडत नाही, तोपर्यंत कारागीराला त्याच्यापासून मिळणारा सलग धागा मिळत नाही आणि हवं तसं वस्त्रही विणता येत नाही. त्याचप्रमाणे नरेंद्र नाईक यांचं "आई" हे ललित जन्माला येण्यासाठी त्यांच्या आईला स्वतःचं बलिदान द्यावं लागलं असावं, याचा प्रत्यय जागोजागी येत राहतो. त्यांच्या प्रत्येक वाक्या वाक्यातून आईचा विरह जाणवतो. तिच्याबद्दलची पराकोटीची कृतज्ञता जाणवत राहते आणि ती कृतज्ञता, विरह खोलवर आहे. उंच वाढलेल्या झाडाचं मूळ जितकं खोल जाऊन पाण्याचा वेध घेते, तेवढ्याच खोलात जाऊन नरेंद्र नाईकांनी आपल्या आईच्या आईपणाचा वेध घेतला आहे. मुळात आई गेल्यानंतर त्यांच्या भावनांचं जे खांडुक फुटलं आणि जखम भळभळत राहिली. त्या जखमेचे व्रण म्हणजे आई! संग्रही असावी अशी आई! पुढे आणखी एक विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नाईकांनी वापरलेली शब्दकळा! अतिशय नाविन्यपूर्ण! पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ घेऊन येणारी. पण ते संदर्भ सर्वांच्याच हाती लागतील असे नाही. नाईकांची आई समजून घेण्यासाठी किती वेळ लागेल? हे कोणीच सांगू शकणार नाही. तसा आई हा शब्दच खूप व्यापक! आख्या सृष्टीला व्यापून टाकणारा. तरीही ती कळली नाही. कळत नाही. त्यासाठी आईच व्हावं लागेल.
 
  - राजू रणवीर, डोंबिवली (पूर्व)
 
<nowiki>*</nowiki>
 
प्रिय नरेंद्रजी नाईक, मी काही कारणामुळे उदगीर येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाला जाऊ शकलो नाही. त्यामुळे आज यू ट्यूबवर साहित्य संमेलनाचा वृत्तांत पाहात होतो. या संमेलनाचे उदघाटक लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे उदघाटकीय भाषण ऐकत असताना, या भाषणात मराठवाड्यातील साहित्यिकांची थोरवी सांगताना नरेंद्र नाईक हे नाव मा. पवार साहेबांनी घेतले, ही आपल्यावर प्रेम करणा-या आमच्या सारख्या अनेकांना सुखावून टाकणारी गोष्ट आहे. आपल्या साहित्याची नोंद एका जाणकार लोकनेत्याकडून व्हावी, ही खूप गर्वाची बाब आहे. बेस्ट बूक सेलर अशी नोंद जागतिक स्तरावर आपल्या पुस्तकाची आहेच. त्यात ही विशेष भर. आपल्या कसदार साहित्य प्रवासास माझ्या मनापासून शुभेच्छा!
 
आपला
 
- प्रा.डॉ. जगदीश कदम, नांदेड
 
<nowiki>*</nowiki>
 
==आईसाठी समानार्थी शब्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले