"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 2409:4042:2C8D:B77A:0:0:F948:EE03 (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:E1C:710:9864:47EE:BC32:BDE6 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २८:
 
सीना या नदीस परांडा तालुक्यातुन वाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.पुढे येऊन सिना नदी ही सोलापूर जिल्ह्यात येते. ती नदी करमाळा येथे येऊन माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातून वाहते. माढा तालुक्यातील उंदरगाव येथे सीना नदीवरील सर्वात मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सीना नदीच्या तीरावरील उंदरगाव हे तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात पवनपुत्र हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, श्री राम,श्री दत्त, श्री गणपती, श्री महादेव, नरसिंह, विठ्ठल बिरूदेव, अंबाबाई, खंडोबा इ. मंदिरे आहेत. माढा-वैराग रोड या गावातून जातो. सीना नदीवर येथे पूल बांधण्यात आला आहे. हा पूल दोन्ही किनाऱ्यावर असणाऱ्या उंदरगाव आणि केवड या गावांना जोडतो.गुंडूबा तथा गुंडेश्वर आणि तेली महाराजांचे मंदिर उंदरगाव व वाकाव या गावावरील सीमेवर आणि सीना नदीच्या किनारी आहे. सीना नदीला उंदरगाव येथे बेंद नाला, घोरडा नाला आणि भोंगाळा नाला मिळतो. तसेच मनकर्णा नदी ही सीना नदीची एक उपनदी आहे.केवड या ठिकाणी नदी तीरावर काळभैरवनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त येथे मोठा उत्सव भरतो. नदीच्या पश्चिमेला इंग्रज तर पूर्वेला निजामच्या साम्राज्याच्या खुणा आजही या गावात पाहायला मिळतात. सीना नदीमुळे परिसरातील बागायती शेतीत वाढ झाली आहे. उंदरगाव परिसरात सीना नदीला सीमामाई असे संबोधले जाते.उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे सीना नदीच्या काठी प्राचीन असे नरसिंह मंदिर आहे .
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
[[वर्ग:सोलापूर जिल्ह्यातील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सीना_नदी" पासून हुडकले