"शिलालेखशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
[[शिलालेख]] Epigraphy म्हणजे शिलालेखशास्त्र होय. हे शास्त्र भाषाशास्त्र (Philology) व हस्ताक्षरशास्त्र (Palaeography) यांना अतिशय जवळचे आहे. या शास्त्रांच्या आधारे अनेक शिलालेख वाचता येतात व त्यांच्या आधारे नवीन माहिती मिळू शकते, शिलालेख व ताम्रपट ही इतिहासासाठी अतिशय उपयुक्त अशी विश्वसनीय साधने मानली जातात. महत्त्वाच्या घटना पूर्वी शिलालेखात नमूद केल्या जात. हे लेख संक्षिप्त स्वरूपाचे असले, तरी त्यावरील नोंदी स्पष्टपणे व निःसंदिग्धपणे, कोणतीही खाडाखोड न करता केलेल्या असतात. त्यावर घटनेप्रमाणे काळाचीही नोंद असते. यामुळे व हा पुरावा समकालीन असल्यामुळे विश्वसनीय मानला जातो. शिलालेख हे एकाच व्यक्तीने लिहिलेले नसतात, त्यामुळे त्यांनी वापरलेले शब्दप्रयोग, वाक्प्रचार भिन्न स्वरूपाचे असू शकतात. या शास्त्राचा उपयोग सांगताना प्रो. रेनियर (Renier) म्हणतात, ऐतिहासिक घटनांचा शोध लावण्यासाठी संशोधकाला सदरचे पुरावे ज्या भाषेत लिहिले आहेत तिची सखोल माहिती आवश्यक आहे. तसेच ( शिलालेख) लिहीत असताना ज्या संक्षिप्त रूपांचा वापर केला आहे ती पद्धती माहीत असणे आवश्यक आहे.
 
ह्या शिलालेखावरील व ताम्रपटावरील कोरलेले शब्द [[ब्राह्मी लिपी|ब्राम्ही]], खरोष्टी अशा प्राचीन लिपीत असतात. ह्या लिपींचा उलगडा झाल्याशिवाय त्यांचा अर्थ लागत नाही. ब्राम्ही लिपीची उकल इंग्लिश ईस्ट इंडियाच्या शासनकाळातील ब्रिटिश अधिकारी जेम्स प्रिन्सेप ह्या शिलालेखतज्ज्ञाने परिश्रमपूर्वक केली.
 
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भयादी}}