"पी.सी. अलेक्झांडर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५९:
 
=== राज्यपाल ===
पुढे राजीव गांधींनी अलेक्झांडरांना इंग्लंडमध्ये उच्चायुक्त म्हणून पाठवले. [[इ.स. १९८८]] मध्ये तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. [[इ.स. १९८८]] ते [[इ.स. १९९०]] या कालावधीत त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर, [[इ.स. १९९३|इ.स.१९९३]] मध्ये, नरसिंह राव पंतप्रधान असताना ते राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात दाखल झाले आणि [[इ.स. २००२]] पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. अलेक्झांडरांनी १२ जानेवारी [[इ.स. १९९३|इ.स.१९९३]] ते १३ जुलै [[इ.स. २००२]] या दीर्घ कालावधीत महाराष्ट्राच्या [[राज्यपाल]]पदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली; ते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले राज्यपाल आहेत, याशिवाय त्यांनी [[तामिळनाडू]], तसेच गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. राज्याच्या मागास भागातील अनुशेष दूर करण्यासाठी अलेक्झांडर यांनी प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत [[इंदिरा गांधी]] आणि [[राजीव गांधी]] यांच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. "उच्च प्रतीचा अभ्यासू प्रशासक' अशी त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा होती. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त आणि जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे सहायक महासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव असणाऱ्या अलेक्झांडरांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
 
=== राज्यसभा सदस्य ===