"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: Reverted कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ५:
 
अनेक [[धर्म|धर्मांच्या]] विश्वासानुसार '''[[देव]]''' ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिस्ती धर्मग्रंथ [[बायबल]]मध्ये देवाला सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ म्हटले आहे.
 
== वैदिक देव ==
प्रथमतः देव ही संकल्पना समजून घेऊ. वैदिक काळात देव, मूर्तिपूजा, यज्ञ, इत्यादी कर्मकांडे नव्हती. वैदिक कालखंडाच्या अखेरच्या काळात देव आणि कर्मकांडे समाजात रुढ होत गेली. दर्शन शास्त्राच्या दृष्टीने, ते योग्यच होते. पण या गोष्टींचा समाजात अतिरेक झाला. तो पाहून, याला पहिल्यांदा विरोध केला तो गौतम बुद्धांनी!
 
देव शब्द '''द''' या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ आहे देणे! या द वरूनच दाता शब्द आला. आपण देवाची भक्ती करतो, पूजा करतो, त्याला नमस्कार करतो व काहीतरी '''मागणे''' मागतो. त्याची पूर्तता करण्यासाठी, ते मिळण्यासाठी, फलद्रूप होण्याची आपण देवाकडून अपेक्षा करतो. देव आपल्याला ते देईल, असा विश्वास असतो. म्हणजेच देणारा तो देव!
 
आपल्या इच्छा व वृत्ती अनेक प्रकारच्या आहेत. त्यानुसार प्रत्येकाची देवाची संकल्पना निरनिराळी असणार! त्यामुळे देवांचे आकार, रंग, वगैरे पण निरनिराळे आहेत. याचेही एक दर्शनशास्त्र आहे.
 
विश्वाची निर्मिती आत्मतत्वापासून क्रमागत आकाश, वायू, तेजस, आप व पृथ्वी या पाच तत्वात झाली आहे. प्रत्येक तत्वाचा एक वर्ण व गुण आहे. ही तत्वे अव्यक्त असून  अतींद्रीय ज्ञानाद्वारे तिची जाणीव होते, अनुभूती येते. आपल्या ऋषिमुनींना, खऱ्या संतांना व ज्ञानी लोकांना, हे माहित होते व आहे. ही विश्व निर्मितीची प्रक्रिया व मनावर होणारे संस्कार, तदनुसार असणारी वृत्ती, यांची सांगड घालून, त्यांना मूर्त रूप दिले व देवदेवतांच्या मूर्ती अथवा प्रतिमा बनवल्या.
 
देवदेवतांना मानवी जीवनाचा भाग बनविण्यासाठी, त्यांच्यावर कथा रचल्या गेल्या. त्यांचे अवतार कल्पीले, त्यांचे जन्म, जीवन व मृत्यू पण दाखवले. त्यांचा दुष्ट वृत्तीचे लोकांशी संघर्ष, दानवांशी संघर्ष, वगैरेही दाखवले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मागच्या व पुढच्या वंशावळी निर्माण केल्या. साधनेत या सगळ्याचे काही महत्त्वाचे स्थान आहे.
 
 '''हे विश्व व वृत्ती अस्तित्वात आहे, होते व भविष्यात असणार आहे! या दोन्हींना आरंभही नाही व शेवटही नाही. त्यांना जन्म नाही व मृत्यूही नाही. आहे ते केवळ स्थित्यंतर! म्हणून देवदेवता अजन्मा आहेत, असे म्हटले आहे.'''
 
आता देवदेवतांच्या दर्शना संबंधी पाहू. आपण वर बघितले की, व्यक्तीगणीक, प्रत्येकाच्या ईच्छा व वृत्ती निराळ्या असतात. यालाच त्या व्यक्तीचा पिंडधर्म म्हणतात. जो ज्या स्वरुपात आपल्या ईष्टदेवतेचे चिंतन करेल, भक्ती करेल, ध्यान करेल, त्यानुसार त्याला ईष्टदेवतेचे दर्शन होईल. म्हणूनच एकाच देवतेची उपासना, अनेकांनी केली तरी, त्या एकाच देवतेचे रुप, सर्वांना एकसारखे न दिसता, निरनिराळ्या आकारात व रंगछटात होईल. म्हणून एका देवतेच्या अनेक प्रकारच्या मूर्ती अथवा प्रतिमा असतात. ज्याला जसा भाव असेल, त्या रुपात त्याला दर्शन होईल! म्हणून '''भाव तैसा देव''' म्हटले आहे. भाव आत म्हणजे मनात आहे, म्हणून देवही देहात आहे.
 
'''तुकाराम महाराज म्हणतात,'''
 
'''देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ।'''
 
'''जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।'''
 
'''जसे दु्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ।'''
 
'''देव देहात देहात, का हो जाता देवळात ।'''
 
'''तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ।'''
 
       उसात साखर व दुधात लोणी असते, पण ते बाहेरून दिसत नाही, तर उस व दुधावर प्रक्रिया केली असता, ते मिळते. त्याचप्रमाणे देवाच्या दर्शनासाठी साधना रुपी प्रक्रिया करायला लागते, मग ते साधन भक्ती, ज्ञान, कर्म वा ध्यान, काहीही असेल!
 
स्थूल अथवा जड जगत व सूक्ष्म अथवा चैतन्य, दोन्हींची निर्मिती प्रक्रिया लक्षात घेऊन दर्शनशास्त्र बनले आहे. दर्शने मानसिक पातळीवर होतात व ती संस्कारांना अनुकूल असतात. मनावरील संस्कार नष्ट झाल्यास, दर्शने होणार नाहीत. त्याऐवजी तत्वदर्शने, निराकार होतील.
 
'''म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे,'''
 
'''तुज सगुण म्हणो की, निर्गुण रे'''
 
'''सगुण निर्गुण एकु, गोविंद रे'''
 
'''अनुमाने ना, अनुमाने ना'''
 
'''श्रुती नेति नेति म्हणती, गोविंदु रे'''
 
'''तुज स्थूळ म्हणो की, सूक्ष्म रे'''
 
'''स्थूळ, सूक्ष्म एकु, गोविंदु रे'''
 
'''तुज दृश्य म्हणो की, अदृश्य रे'''
 
'''दृश्य, अदृश्य एकु, गोविंदु रे'''
 
'''निवृत्ती प्रसादे, ज्ञानदेव बोले'''
 
'''बाप रखुमादेवीवरू, विठ्ठलु रे'''
 
'''ज्ञानेश्वर माऊलींच आराध्य दैवत आहे विठ्ठल!'''
 
       नवस, इच्छापूर्ती, कामनापूर्ती, संकल्पपूर्ती,  इत्यादि मनाच्या तीव्र संकल्पावर अवलंबून आहेत. संकल्पात शक्यतो दुसर्‍यांचे नुकसान अथवा हानी नको म्हणजे संकल्पपूर्ततेसाठी विरोध निर्माण होणार नाही. जितका संकल्प अथवा इच्छा दृढ तितकी घटना घडून येण्याची शक्यता अधिक व लवकर! या शास्त्राची गती समजणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हे अतींद्रीय व अनुभवाचे शास्त्र आहे. मन वायु तत्वात आहे व तिथेच इच्छांचा उगम आहे. खरंतर इच्छा अथवा संस्कारांमुळेच मनाची निर्मिती आहे. '''''<nowiki/>'संकल्प विकल्पात्मक मनः'''''' अशी मनाची व्याख्या आहे. तीव्र इच्छांमुळे जडतत्वात धारणा होते व घटना घडून येतात.
 
कर्मकांड आणि विधीं मुळे कदाचित मनाची एकाग्रता व म्हणून धारणाशक्ती वाढेल. परंतु मानवी प्रयत्‍नही तितकेच महत्त्वाचे आहेत. अशी कोणतीही शक्ती या विश्वात नाही की जी आपल्याला हातपाय न हलवता आयते आणून देईल. जेव्हा असे घडले, असे वाटते तेव्हा तो मानवी प्रयत्नांचा, पूर्ततेसाठीचा क्षण जवळ आलेला होता, इतकेच समजावे!
 
==देव नावाची माणसे==
"https://mr.wikipedia.org/wiki/देव" पासून हुडकले