"मोरेश्वर रामचंद्र पराडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:मोरोपंत.jpg|अल्ट=मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र पराडकर|इवलेसे|कवी मोरोपंत ]]'''मोरेश्वर रामचंद्र पराडकर''' तथा '''मोरोपंत''', '''मयूर पंडित''' (जन्म : [[पन्हाळगड]] इ.स. १७२९; - [[बारामती]], चैत्री पौर्णिमा, १५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते [[मुक्तेश्वर]], [[वामन पंडित]], [[रघुनाथ पंडित]] आणि [[श्रीधरकवी|श्रीधर]] यांचे समकालीन पंडित कवी होते.
 
पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे [[कोकण]] येथील [[सौंदळ]] गावचे होय. मोरोपंतांचा जन्म [[पन्हाळगड]] येथे झाला. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने [[कोकण|कोकणातून]] [[पन्हाळगड|पन्हाळगडावर]] येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते [[कोल्हापूर]]च्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. [[पन्हाळगड|पन्हाळगडावरील]] [[केशव पाध्ये]] व [[गणेश पाध्ये]] या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी [[न्याय]], [[व्याकरण]], [[धर्मशास्त्र]], [[वेदान्त]] व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे [[पन्हाळगड|पन्हाळगडावर]] वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून [[बारामती]]स गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून [[बारामती]]स गेले व कायमचे [[बारामती]]कर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन [[बारामती]]स झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार [[आर्या]], [[श्लोक]]बद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी [[ओवी]]बद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतांनी त्यांच्या चार गुरूंचा उल्लेख आपल्या 'गंगावकिली' या काव्यात केला आहे. ते म्हणतात, 'गुरू माझे श्रीराम, श्रीमत्केशव, गणेश, हरि, चवघे'. हरी म्हणजे पंतांचे मौजीबंधन करणारे त्यांचे सौंदळचे कुलोपाध्याय हरभट वरेकर. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास - भाग सातवा|last=देशपांडे|first=अच्युत नारायण|publisher=व्हीनस प्रकाशन|year=१९८८|location=पुणे|pages=१०१}}</ref> श्रीराम म्हणजे वडील रामजीपंत. गोळवलकर घराण्यातील केशव पाध्ये व गणेश पाध्ये हे दोघे बंधू अशा चार गुरूंचा उल्लेख मोरोपंतांनी केलेला आहे. <ref name=":0" />