"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ १८:
 
== जीवनवृत्त ==
[[चित्र:leafydragon.jpg|thumb|200px| मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माशाचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माशाचा जवळ जाणारा आहे. याच्या कल्ल्यांच्या पानासारख्या रूपामुळे हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.]]माशांचे जीवनवृत्त सर्वसाधारणपणे पाण्यातील एकंदर परिस्थितीशी जुळणारे असते. ही परिस्थिती विविध प्रकारची असल्यामुळे जीवनवृत्तातही विविधता आढळते. माशांना बाह्य जननेंद्रिये नसतात. मादी पाण्यात अंडी सोडते व त्याच वेळी तिच्याजवळ असणारा नर अंड्यावर शुक्राणूंचा (पु-जनन पेशींचा) वर्षाव करतो. अंड्याचे निषेचन (फलन) व पुढील विकास पाण्यातच होतो. अंड्यातून डिंभ (भ्रुणानंतरचीभ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगाणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येण्यास अठरा तासांपासून काही आठवड्यांचा अवधी लागतो. किती अवधी लागावा हे त्या जातीवर व तापमान वगैरेंसारख्या भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते.डिंभाचे रूपांतरण प्रौढात होते. यास लागणारा कालही माशाच्या जातीवर अवलंबून असतो. पुष्कळ माशांत थोडे दिवस पुरतात, तर ईल या माशास ३ किंवा ४ वर्षे व लॅंप्री या माशास पाच वर्षे लागतात. साधारणपणे अंडी निषेचित झाल्यावर तो इतस्ततः वाहत जात असतानाच वाढत असतात व शेवटी डिंभ बाहेर पडतो. स्टिकलबॅक, गुरामी, सयामी फायटर, शिंगाडा इ. माशांत नर किंवा मादी अंड्याची किंवा पिलांची काळजी घेतात. पिसिलीडी व इतर काही मत्स्यकुलांत अंड्याचे निषेचन व गर्भाची वाढ मादीच्या शरीरातच होते व ही मादी अंडी न घालताच पिलांना जन्म देते. या माशांत बाह्य जननेंद्रियेही आढळतात. मुशी, वागळी, पाकट इ. उपास्थिमिनांतही ( ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनलेला असतो अशा माशांतही) अशीच प्रजनन व्यवस्था असते. काही माशांत अंड्यांचे निषेचन मादीच्या शरीरात होते व पुढची वाढ बाहेर पाण्यात होते. काही थोड्याजाती
 
उभयलिंगी आहेत; परंतु त्यांच्यातील पुं-जनन तंत्र (नरांतील जनन संस्था) व स्त्री-जनन तंत्र निरनिराळ्या वेळी पक्व होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मासा" पासून हुडकले