"अगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — इंग्रजी colon चा मराठी विसर्ग (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ ७:
या अगरूच्या फांद्या वेडय़ावाकडय़ा असून त्याचे खोड नरम असते. त्याचा औषधात उपयोग होतो. याची चव कडवट, तुरट, तेलकट असते. यापासून मिळणारे तेल त्वचारोगात लेप लावण्यासाठी वापरतात. सुगंधामुळे हे तेल उत्तेजक आहे. या तेलाचा कानात टाकून कर्णरोग निवारणासाठी उपयोग होतो. कोडाचे पांढरे डाग कमी होण्यास अगरू तेल लावतात. सांधेदुखीतही वेदनास्थानी तेल चोळतात. सर्दी, खोकला, दमा अशा श्वासाच्या विकारात अगरूचे १-२ थेंब तेल विडय़ाच्या पानात टाकून खायला देतात. नस्य करण्यास नाकातही थेंब टाकतात. बाजारात उपलब्ध अणूतेलातील अगरू हा महत्त्वाचा घटक आहे.
अगरूची उत्पत्ती थंड प्रदेशात होते. याचा प्रमुख उपयोग शीत प्रशमन म्हणजेच थंडीपासून निवारण करणे होय. अगरु गरम असल्याने थंडीत याचा लेप लहान मुले, वृद्धलोक यांच्या तळ हातपाय, छातीवर, कापडावर लावतात किंवा अगरू तेल गरम करून चोळतात. मालीश करतात.
मुखाची दरुगधी कमी करण्यास अगरूचा तुकडा सुपारीप्रमाणे तोंडात धरतात. याने अपचनाचे विकार, पोटाचा फुगारा व वायुदोष कमी होतो. लहान मुलांमध्ये होणाऱ्या शय्यामूत्रतेत म्हणजे झोपेत अंथरूणअंथरुण ओलं करणे यात दोन थेंब दुधात टाकून देतात. सुगंधी उटण्यातही अगरू वापरतात. वस्त्राला सुगंध येण्यास अगरूचा तुकडा कपडय़ात ठेवतात. अगरूपासून इसेन्स, परफ्यूम बनवितात. थकवा घालविण्यास याचे चूर्ण पाण्यात टाकून घेतल्यास याने हुशारी वाढून तरतरीतपणा येतो. असा अगरू औषधी उपयोगी असला तरी महाग आहे;
 
==उत्पत्तिस्थान==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगर" पासून हुडकले