"मैसुरु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख म्हैसूर वरुन मैसुरु ला हलविला: अधिकृत नाव
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
ओळ ३:
'''मैसुरू''' तथा '''म्हैसूर''' हे [[कर्नाटक]] राज्यातील तिसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे आणि म्हैसूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. ९,२०,५५० लोकसंख्या असलेले म्हैसूर शहर [[बेंगळुरू]]च्या १४६ किमी दक्षिणेस [[चामुंडी]] टेकड्याच्या पायथ्याशी आहे. म्हैसूर महानगरपालिका हे शहराच्या नागरी प्रशासनासाठी जबाबदारी साभांळ्ते. १३९५ ते १९५६ साला पर्यंत ते सुमारे सहा शतकांपर्यंत हे शहर [[म्हैसूर संस्थान]]ची राजधानी शहर म्हणून विकसीत झाले. १७६० व १७७० च्या दशकातील [[हैदर अली]] व [[टीपू सुलतान|टीपू सुलतानची]] सत्ता असताना थोड्या काळादरम्यान, [[वडियार]] राजवटीचे म्हैसूरवर राज्य होते. वाडीयार हे कला आणि संस्कृतीचे आश्रयदाते होते आणि त्यांनी शहराच्या व राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत लक्षणीय योगदान दिले व म्हैसूरला सांस्कृतिक राजधानीचाही दर्जा प्राप्त झाला.
 
म्हैसूर हे येथील वडियार राजघराण्याच्या आणि इतरही काही सुंदर आणि भव्य राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हैसूर राजघराण्यात साजरा होणारा [[दसरा]] उत्सव पहाण्यासाठी देशातून व जगभरातून हजारो पर्यटक येतात. म्हैसूरची ओळ्ख ही इतर अनेक रुपानेरूपाने प्रसिद्ध आहे जसे की म्हैसूर चित्रकला, [[म्हैसूर पाक]], [[म्हैसूर मसाला डोसा]], [[म्हैसूरचा चंदनाचा साबण]], [[म्हैसूर शाई]] इ. [[म्हैसूरी फेटा]] (पारंपरिक [[रेशीम]] [[पगडी]]) आणि म्हैसूरला पारंपारिक रेशमी साडी उद्योगांच्या बरोबरीने [[पर्यटन]] हे प्रमुख उद्योग आहेत.
 
म्हैसूर शहरात भारतातील पहिले खाजगी [[रेडिओ]] केंद्राची स्थापना झाली. [[म्हैसूर विद्यापीठ|म्हैसूर विद्यापीठात]] आजवर अनेक लक्षवेधक [[शास्त्रज्ञ]], [[लेखक]], [[राजकारणी]], [[कलाकार]], [[गायक]] आणि [[क्रीडापटू]] तयार झालेत. [[क्रिकेट]] आणि [[लॉन टेनिस]] हे शहरातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/मैसुरु" पासून हुडकले