"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
ओळ ११:
 
'''मराठी रंगभूमीवरील बुकिश नाटके:-'''
मराठी रंगभूमीवर बुकिश नाटकांची लाट आली तो [[काळ|कालखंड]] म्हणजे [[विष्णूदास भावे|विष्णूदास भावेंच्या]] कालखंडानंतर साधारणपणे १८६१ च्या दरम्यान [[विद्यापीठ|विश्वविद्यालयाची]] स्थापना होऊन [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[इंग्रजी]] [[शिक्षण]] सुरू झाल्यावर त्या शिक्षणाने जे काही परिणाम झाले त्यातील एक म्हणजे लोकांची बुकिश नाटकाकडील प्रवृत्ती वाढली. [[महाविद्यालय|महाविद्यालयामध्ये]] [[विल्यम शेक्सपिअर|शेक्सपिअर]], [[कालिदास]] यांच्या नाटकाचा रसास्वाद जेव्हा उमजू लागला तस तसे इंग्रजी, [[संस्कृत]] नाटकाचे प्रयोग होऊ लागले. संस्कृत नाटकांची, इंग्रजी भाषेतील नाटकांची भाषांतरे होऊन [[पाश्चिमात्यीकरण|पाश्चिमात्य]] रीतीरिवाज, आचारविचार यांच्याकडे मराठी रंगभूमीचा ओढा वाढला. विद्वान मंडळींनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची भाषांतरे किंवा रुपांतरेरूपांतरे केली त्याचबरोबर स्वतंत्र नाटके मराठीत रचून नाटक मंडळींना शिकवली याचा मराठी रंगभूमीला उपयोग झाला व सुधारणा झाली. बुकिश नाटकांकडे कल वाढविण्यास प्रामुख्याने ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’ कारणीभूत आहे. ‘वेणीसंहार’, ‘ऑथेल्लो’, ‘तारा’, ‘किंगलियर’, शंकरराव पाटकर हे नट ‘ऑथेल्लो’ नाटकातील ‘यागोची’ व्यक्तिरेखा खूप कमालीची करीत.
बुकिश नाटकापासून पडदे, [[पोशाख]], देखावे वैगरे या बाबतीत खूपच सुधारणा झाल्या. बुकिश नाटकासंबंधाने सर्वात चांगले नाव मिळवलेली नाटक मंडळी म्हणजे ‘शाहूनगरवासी’ हीच होय. ‘त्राटिका’ हे नाटक शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ धी श्र्यू’ या नाटकाच्या आधारावर रचलेले आहे. विनोदी व हास्यपूर्ण आहे. प्रोफेसर वासुदेवराव केळकर व शंकर मोरो रानडे यांच्या साह्याने ही मंडळी बुकिश नाटकाचे प्रयोग करीत असे. [[सामाजिक समूह|सामाजिक]], [[इतिहास|ऐतिहासिक]] नाटकेसुद्धा या दरम्यान रंगभूमीवर आली. मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. स्वतंत्र पहिले ऐतिहासिक नाटक म्हणून ‘[[थोरले माधवराव पेशवे]]’ याचा उल्लेख करावा लागेल. वि. ज. कीर्तने यांनी १८६१ साली हे लिहिले. बुकिश नाटकांनी मराठी रंगभूमीवर गद्य नाटके समृद्ध केली.
ओळ ४४:
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच [[ब्रिटिश (निःसंदिग्धीकरण)|ब्रिटिशांनी]] त्याच्या सत्तेचा पाश आवळायला सुरुवात केली होती. [[इ.स. १८१७|१८१७]] मध्ये [[पेशवे|पेशव्यांनी]] [[पुणे|पुणेही]] त्यांच्या ताब्यात दिले आणि [[इंग्रज|इंग्रजांचा]] एकछत्री अंमल सुरू झाला. प्रशासन चालवण्यास उपयुक्त असणारे [[इंग्रजी]] जाणणारे [[कर्मचारी]] निर्माण करण्यासाठी [[इ.स. १८५२|१८५२]] मध्ये ब्रिटिशांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाची]] स्थापना केली.
 
[[विद्यापीठ|विद्यापीठात]] शिकवण्यात आलेल्या इंग्रजी [[साहित्य|साहित्याद्वारे]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[विल्यम शेक्सपिअर|शेक्सपिअरचा]] परिचय झाला. त्याच्या सुखात्मिका, शोकात्मिका, त्याचे [[भाषा|भाषावैभव]], त्याच्या नाटकांतील विलक्षण व्यक्तिरेखा ह्यांचे नवे दालनच मराठी माणसांसमोर खुले झाले. ह्या नाटकांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे मराठीत [[अनुवाद]] केले, काहींनी रुपांतरेरूपांतरे केली, तर काहींनी त्यावर आधारित नवीन नाटके लिहिली. एकूण झाले काय तर विद्यापिठांत शिकणाऱ्या आणि न शिकणाऱ्या अशा सर्वांपर्यंतच शेक्सपिअर पोचला.
 
ह्याच काळात अनेक संस्कृत नाटकांची देखील मराठीत [[भाषांतर|भाषांतरे]] झाली. [[संस्कृत]] नाट्यरचनेचा प्रभाव असलेली स्वतंत्र मराठी नाटके देखील लिहिली गेली. त्यांचे प्रयोग झाले नाहीत. पण विष्णूदासी पद्धतीच्या आख्यान नाटकांचेच प्रयोग प्रचलित होते.
ओळ ५५:
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात [[पश्चिम दिशा|पश्चिम]] [[भारत|भारतात]] [[पारशी]] नाटकांचा उदय झाला. [[व्यापारी]], [[उद्योजक]] पारशी समाज यांच्याकडून ह्या नाटकांना अर्थसहाय्य होत असल्यामुळे त्यांना पारशी नाटके असे म्हणत असत. [[गुजरात|गुजराती]] तसेच हिंदुस्थानी भाषांमधून ती नाटके सादर होत असत. सादरीकरणाच्या पद्धतीवर युरोपीय प्रभाव होता, पण त्यांची कथानके मात्र भारतीय [[पुराणे]], [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] सुरस आणि चमत्कारिक कथा आणि शेक्सपिअरची नाटके ह्यांच्यावर आधारित अशी होती. ह्या नाटकांमधले संगीत आणि [[नृत्य]] हे एकोणिसाव्या शतकातल्या तवायफ परंपरेतील होते. पारशी नाटकांचे प्रयोग [[लाहोर]], [[आग्रा]], [[लखनौ]] तसेच [[मुंबई]] येथे होत असत. बहुतेक सर्व प्रयोग ब्रिटिशांनी बांधलेल्या [[कमान|कमानी]]-मंच पद्धतीच्या नाटकघरांमध्येच होत असत. कथानक, वेशभूषा आणि संगीत भारतीय परंपरेतील तर सादरीकरणाची आणि अभिनयाची पद्धत काहीशी पाश्चिमात्य असे विलक्षण मिश्रण पारशी नाटकात होते.
 
अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात कीर्तन, दशावतार, लळीत, [[भारूड|भारूडासारख्या]] लोकपरंपरा, विष्णूदासी पद्धतीची आख्यान नाटके, शेक्सपिअरच्या नाट्य-संहिता, त्यांचे मराठी अनुवाद, रुपांतरेरूपांतरे, संस्कृत नाटकांचे मराठी अऩुवाद, ब्रिटिश नाटक मंडळ्यांचे नाट्यप्रयोग, कमानी-मंच नाटकघरे, पारशी नाटके असे विविध प्रकार रंगभूमीवर नांदत होते. महाराष्ट्रात मराठी संगीत नाटक उगम पावले त्यामागे त्या काळात ही सर्व पार्श्वभूमी होती.
 
१९३१ मध्ये महाराष्ट्रात बोलपटांचे आगमन झाले. तोपर्यंत मराठी नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, पण मुका चित्रपट जसा बोलायला लागला, तशी लोकांना नाटकापेक्षा त्याचीच गोडी जास्त वाटू लागली, नाटकघरांचे रूपांतर [[चित्रपटगृह|चित्रपटगृहांमध्ये]] झाले आणि मराठी नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली.