"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ८६:
गावात पूर्वी जिनींग अँड प्रेसिंगचे कारखाने होते. गावात कापसाचा व सरकीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. त्याचप्रमाणे फैजपूर हे पूर्वी त्याच्या ऑइल मिल्ससाठीसुद्धा प्रसिद्ध होते. येथील तेल देश विदेशात निर्यात होत असे. सद्यस्थितीत त्यातील केवळ एक ऑइल मिल कार्यान्वयित असून अन्य मिल्स बंद झाल्या आहेत. बुधवारी फैजपुरात गावरान तुपाचा बाजार वाणी गल्लीत भरायचा. या भागाला आजही तूप बाजार म्हणून ओळखले जाते. फैजपूर येथे असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना हा जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात पहिले उभारला गेलेला साखर कारखाना आहे.
 
===कॉंग्रेसचेकाँग्रेसचे प्रथम ग्रामीण अधिवेशन===
 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासावे (५० वे) अधिवेशन हे २७ आणि २८ डिसेंबर १९३६ रोजी फैजपूर येथे करण्यात आले होते. हे अधिवेशन कॉंग्रेसचेकाँग्रेसचे प्रथम ग्रामीण अधिवेशन होते. या अधिवेशनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेससाठी फैजपूर अधिवेशन महत्त्वाचे होते. फैजपूर अधिवेशनचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते जे तत्कालीन काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते होते आणि राजमल ललवाणी त्या परिषदेचे कोषाध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधी व इतर दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते. त्या ठिकाणी आता ‘नेहरू विद्यानगर’चा परिसर आहे. तेथे धनाजी नाना विद्यालय, बी.एड. कॉलेज व फार्मसी इन्स्टिट्यूट आहेत. या अधिवेशनाचा देखावा शहरातील छत्री चौकातल्या भिंतीवर साकारण्यात आला आहे.
 
== संत खुशाल महाराज ==