"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील [[परांडा तालुका]] ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते [[करमाळा]] तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे. नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत. मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथे [[रामदास स्वामी]] यांचे शिष्य [[कल्याण स्वामी]] यांची समाधी आहे. तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे. कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलाशयाला 'कल्याण सागर' असे म्हणतात. जवळच सोनारी येथे [[कालभैरव|कालभैरवाचे]] प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे [[भीमा नदी]]स मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.
 
सीना या नदीस परांडा तालुक्यातुन वाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.पुढे येऊन सिना नदी ही सोलापूर जिल्ह्यात येते. ती नदी करमाळा येथे येऊन माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातून वाहते. माढा तालुक्यातील उंदरगाव येथे सीना नदीवरील सर्वात मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सीना नदीच्या तीरावरील उंदरगाव हे तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात पवनपुत्र हनुमान, विठ्ठल रुक्मिणी, श्रीरामश्री राम,श्रीदत्तश्री दत्त, श्रीगणपतीश्री गणपती, श्री महादेव, नरसिंह, विठ्ठल बिरूदेव, अंबाबाई, खंडोबा इ. मंदिरे आहेत. माढा -वैराग रोड या गावातून जातो. सीना नदीवर येथे पूल बांधण्यात आला आहे. हा पूल दोन्ही किनाऱ्यावर असणाऱ्या उंदरगाव आणि केवड या गावांना जोडतो.गुंडूबा तथा गुंडेश्वर आणि तेली महाराजांचे मंदिर उंदरगाव व वाकाव या गावावरील सीमेवर आणि सीना नदीच्या किनारी आहे. सीना नदीला उंदरगाव येथे बेंद नाला, घोरडा नाला आणि भोंगाळा नाला मिळतो. तसेच मानकर्णामनकर्णा नदी ही एकासीना नदीची एक उपनदी आहे.केवड या ठिकाणी नदी तीरावर काळभैरवनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त येथे मोठा उत्सव भरतो. नदीच्या पश्चिमेला इंग्रज तर पूर्वेला निजामच्या साम्राज्याच्या खुणा आजही या गावात पाहायला मिळतात. सीना नदीमुळे परिसरातील बागायती शेतीत वाढ झाली आहे. उंदरगाव परिसरात सीना नदीला सीमामाई असे संबोधले जाते.उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे सीना नदीच्या काठी प्राचीन असे नरसिंह मंदिर आहे .
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सीना_नदी" पासून हुडकले