"भूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
* गानगूड :
* गिऱ्हा : गिऱ्हा हे भूत कोकणाप्रमाणे घाटावरही नाव कमावून आहे. ते पाणवठ्यावर राहात असे आणि माणसाला पाण्यात ओढून नेऊन त्याची नाना प्रकारची चेष्टा करीत असे. ‘काय गिऱ्हा लागलाय मागे?’ हा वाक्प्रचार या गिऱ्हामुळेच रूढ झाला असावा.
* खवीस : खवीस हे भूत दोन-तीन प्रकारचे आहे. खवीस जसे महारा-मातंगांचे असते, तसेच ते ॲबिसियन लोकांचेपण असे. हबशी किंवा सिद्दी जे कोकणात स्थायिक झाले, त्यांची भुते पण चौदाव्या-पंधराव्या शतकापासून कोकणात दिसायला लागली.
* चकवा : चकवा हा अनेक गावांच्या सीमांवर राहतो, आणि रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवत ठेवतो. चकव्यालाच मनघाल्या म्हणतात.
* चिंद : घाटावरचे हे भूत महिलेच्या पोटी जन्म घेऊन तिच्या वाट्याचे अन्न खाते, असे म्हणतात.
* चैतन्य : स्त्रियांना कामुक करून भटकवत ठेवणारा भूत
* चेडा : छेडा म्हणजे अविवाहित महाराचे भूत. छेडा मुख्यत्वे वेशीवर राहात असते. शूद्रांची अर्थात महारा-मातंगांची भुते वर्षातून एकदा नारळ, केळी, साखर, कोंबड्यांचा किंवा बोकडाचा बळी दिल्यावर त्रास देत नाहीत. कधी कधी ही भुते होळीवर, डोंगरात किंवा जंगलात वावरत असत.
* जखीण : सवाष्ण स्त्री मेल्यावर भूत झालीच तर ‘जखीण’ होते.
* झोटिंग : कोळ्यांच्या किंवा मुसलमानांच्या भुतांना झोटिंग म्हणतात. झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील तर त्यांची बाधा दूर करणे, हे हिंदू देवऋषांच्या अावाक्यात नसते, अशी धारणा आहे.
Line २५ ⟶ २४:
* तळखांब : अविवाहित शूद्र पुरुष मेल्यावर भूत झालाच तर त्या भुताला ‘तलखांब’ म्हणतात.
* दाव : कुणब्याच्या भुताला ‘दाव’ म्हणतात. हे बहुधा एकाकी भटकते.
* देवचार : लग्न झाल्यानंतर अल्पावधीत जो शूद्र मरतो, तो ‘देवाचार’ होतो. देवाचार भूत गावकुसाबाहेर चारी दिशेला राहते.
* पीस :
* ब्रह्मग्रह : वेदविद्यासंपन्न, पण ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो, तेव्हा अशा भुताला ‘ब्रह्मग्रह’ म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/भूत" पासून हुडकले