"पाचगणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:सातारा जिल्ह्यामधील गावे → वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ ५:
जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे.असे मानले जाते पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.
 
[[लोणावळा]]-[[खंडाळा]] ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार [[महाबळेश्वर]]-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. येथील टेबल लॅंड वर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे.ह्या ठिकाणी येण्यासाठी मुंबई वरून तीन मार्ग आहेत महड महाबळेश्वर मार्गे, व पुणे वाई मार्गे आणि पुणे वरून सरळ उडतरें गावातून सरळ कुडाळ पाचगणी हा रस्ता आहे
 
 
[[वर्ग:थंड हवेची ठिकाणे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पाचगणी" पासून हुडकले