"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मुलाचे संगोपन व राजकारभार: महाराजांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख होता . त्यास शिवराय असे केले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५७:
 
==मुलाचे संगोपन व राजकारभार==
शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती [[पुणे|पुण्याची]] जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. [[निजामशाही]], [[आदिलशाही]] आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी [[दादोजी कोंडदेव]]जिजाऊ यांच्या सोबत नेटाने [[पुणे]] शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या [[रामायण]], [[महाभारत|महाभारतातील]] गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या [[रावण|रावणाचा]] वध करणारा [[राम]] किती पराक्रमी होता, [[बकासुर|बकासुराचा]] वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा [[भीम]] किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://zeemarathijagruti.com/stories-from-past/rajmata-jijau-information-in-marathi|title=Rajmata Jijau, आदर्श राजमाता जिजाऊ|दिनांक=2017-01-11|संकेतस्थळ=Zee Marathi Jagruti|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, [[अफजलखान|अफजलखानाचे]] संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.