"रेल्वे इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१))
खूणपताका: Manual revert Reverted
छो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))
 
'''रेल्वे इंजिन''' हे [[रेल्वे वाहतूक]]ीसाठी वापरले जाणारे वाहन आहे. एक [[रेल्वे]]गाडी वाहून नेण्यासाठी किमान एका इंजिनाची आवश्यकता असते. बरेचदा इंजिन रेल्वेच्या पुढे असते व गाडी ओढण्याची क्रिया करते तर काही वेळा रेल्वेच्या मागे जोडलेले इंजिन गाडी ढकलते. ओढायला एक व ढकलायला एक अशी एका रेल्वेला दुहेरी इंजिनेदेखील आढळतात (उदा. [[मुंबई]]-[[पुणे]] प्रवासादरम्यान [[कर्जत]]हून [[लोणावळा|लोणावळ्याला]] जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या).
 
इंजिने विविध प्रकारची [[ऊर्जा|उर्जा]] वापरून चालवली जाउ शकतात. उर्जेवर चालणाऱ्या इंजिनांचा शोध लागण्यापूर्वी रेल्वे वाहतूकिसाठीवाहतूकीसाठी मनुष्य किंवा [[घोडा|घोडे]] वापरले जत असत. जगातील सर्वात पहिले [[कोळसा|कोळशावर]] चालणारे [[वाफेचे इंजिन]] रिचर्ड ट्रेव्हिथिक ह्या [[कॉर्नवॉल|कॉर्निश]] संशोधकाने बनवले. त्यानंतर नजीकच्या काळात [[इंग्लंड]]मधे ''सालामान्का'', ''पफिंग बिली'', ''द रॉकेट'' ह्यांसारखी अनेक इंजिने बनवण्यात आली. १८३० साली वाफेच्या इंजिनावर जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे [[मॅंचेस्टर]] व [[लिव्हरपूल]] ह्या शहरांदरम्यान धावली.
 
==इंजिनांचे प्रकार==
*[[डिझेल इंजिन]]: १९४० च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमध्ये]] डिझेल इंजिनांचा वापर सुरू झाला व [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] जगभर डिझेल इंजिने वापरात आली. [[मोटारवाहन]]ांप्रमाणे डिझेल इंजिनामध्ये [[अंतर्गत ज्वलन इंजिन]] हे तंत्रज्ञान वापरून यांत्रिक उर्जा तयार केली जाते. वाफेच्या इंजिनांच्या तुलनेत डिझेल इंजिने अधिक कार्यक्षम असतात व त्यांची देखभाल कमी करावी लागते तसेच त्यांच्यामुळे कमी वायू[[प्रदूषण|प्रदुषण]] होते.
 
*[[विद्युत इंजिन]]: ह्या प्रकारचे इंजिन [[विद्युत]]शक्तीवर चालते. [[लोहमार्ग]]ांच्या वर विद्युतभाराचा पुरवठा करणाऱ्या तारा उभारल्या जातात व ह्या तारांद्वारे इंजिनाला विद्युतपुरवठा होतो. लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्यासाठी बराच खर्च येतो परंतु विद्युत इंजिने चालवण्यासाठी कमी खर्च येतो व विद्युत इंजिनांचे आयुर्मान बरेच जास्त असते. जगातील बहुसंख्य देशांमधील रेल्वेगाड्या सध्या विद्युत इंजिनांवर चालतात. भारतातील ८५ टक्के प्रवासी रेल्वे वाहतूकिसाठीवाहतूकीसाठी विद्युत इंजिने वापरली जात आहेत.
 
==गॅलरी==
८१,७८२

संपादने