"शिरस्त्राण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert Reverted
ओळ ७:
 
== ख्रिस्तपूर्व काळातील शिरस्त्राणे ==
ख्रिस्तपूर्व काळातील प्राचीन ग्रीस व रोममध्ये मेणात उकळून कडक केलेल्या चामड्यापासून अथवा पंचधातूंपासून साध्या टोपीसारखी बनविलेली शिरस्त्राणे वापरली जात. पुढे त्यांवर कोंबड्याच्या तुऱ्या सारखा मागे व पुढे लोंबणारा धातूचा तुरा बसवू लागले. हा प्रकार अथीना या ग्रीक देवतेच्या पुतळ्यामध्ये दिसून येतो. रोम शहरात नागरिकांच्या करमणुकिसाठीकरमणुकीसाठी जी द्वंद्वे आयोजिली जात, त्यात लढणाऱ्या योद्धाची म्हणजे ग्लॅडिएटरची शिरस्त्राणे वैशिष्ट्यपूर्ण असत [रोमन ग्लॅडिएटर]. त्यांची कड रुंद असे व त्यावर चेहऱ्याच्या संरक्षणासाठी खालती ओढता येणारी झडप असून बघण्यासाठी तिच्यात झरोका असे.
 
पुढे उत्तर व पश्चिम युरोपमध्ये वापरात असलेली शिरस्त्राणे म्हणजे अर्धगोल अथवा शंकूच्या आकाराच्या टोप्या असत. प्रारंभी पंचधातू अथवा लोखंडाच्या पट्ट्यांनी मजबुती दिलेल्या चामड्यापासून बनविलेली ही शिरस्त्राणे पुढे पूर्णतया धातूंचीच बनू लागली. नाकाचा बचाव करण्यासाठी इ. स. १००० च्या सुमारास धातूची जाडी कांब त्यावर बसविण्यात आली. हा शिरटोप घालण्यापूर्वी बारीक आकाराच्या लोखंडी साखळ्यांपासून बनविलेले आवरण प्रथम डोक्यावर घालून त्यावर शिरस्त्राण चढवत असत. भारतात राणाप्रताप यांच्या तैलचित्रातील शिरस्त्राणात या प्रकारची वैशिष्ट्ये दिसतात.