"परिभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य दीर्घ वेलांटी (अधिक माहिती)
ओळ २१:
# शब्दामधील अर्थछटा व सुक्ष्मता व्यक्त करण्यासाठी जवळच्या शब्दांचे एक कुळ बनवून प्रत्येक शब्दासाठी योग्य असे पर्याय घेण्यात येतात.
 
परिभाषा निर्माण करताना अनेकदा जे नवीन शब्द तयार करावे लागतात त्यासाठी संस्कृत भाषेचा आधार घ्यावा लागतो. उपसर्ग आणि प्रत्यय प्रक्रियेने नवीन नवीन शब्द तयार केले जातात किंवा नाम अथवा धातू यापासून साधित शब्द बनविले जातात. कोणताही शब्द अवघड किंवा सोपा नसतो, तो परिचित किंवा अपरिचित असतो. परिचयाने वापर केल्याने तो सोपा वाटतो. वरील परिभाषा तयार करण्याच्या पद्धतीचा वापर करून केंद्र सरकारच्या शास्त्रीय व तांत्रिक परिभाषा (CSTT) आयोगाच्या धोरणानुसार व भाषा सल्लागार मंडळाने वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी आधारभूत ठरवलेली निदेशक तत्त्वे विचारात घेतली आणि राज्यातील प्रत्येक विद्यापीठाचा त्या त्या विषयातील तज्ञ प्राध्यापक व मराठी विज्ञान परिषदेचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या विषयावर उपसमित्या स्थापन करून त्यांच्या सहकार्याने भाषा संचालनालयाने आतापर्यंत सुमारे २५ विषयांचे परिभाषा कोश तयार केलेले आहेत. यामधील एकूण्‍ सुमारे दोन लाख सदुसष्ट हजार शब्द श्री. संजय भगत, पुणे यांनी इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत. तथापि विज्ञान क्षेत्रात दररोज होणारे नवीन संशोधन आणि त्यासंबंधातील नवीन आव्हाने पेलण्यास ही परिभाषा अपुरी ठरते. त्यासाठी त्यांच्या सुधारित आवृत्या काढण्याचे तसेच उच्च माध्यमिक व महाविज्ञालयीन अभ्यासक्रमात नव्यावे समावेश झालेल्या विषयांची परिभाषा तयार करण्याचे काम करणे गरजेचे आहे. याचप्रमाणे मराठी भाषेच्या विविध बोली, आधुनिक संगणक शास्त्र, अवकाश विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग, वाणिज्य, विधी व न्याय आणि उच्चशिक्षण यामध्ये मराठी भाषेचा वापर व प्रमाणिकरणप्रमाणीकरण करण्यासंबंधात येणा-या विविध अडचणी व उपाययोजना इ. संबंधात प्रत्येक मराठी भाषा विभाग प्रमुखांनी मूलभूत संशोधन करणे, मराठी भाषेतील शब्दसंपत्ती वाढविणे आणि मराठी भाषा ज्ञानभाषा करणे ही मराठी भाषा समृद्ध करण्याची महत्त्वाची साधने आहेत. त्यांचा उपयोग करून मराठी भाषा चांगली समृद्ध करणे आवश्यक आहे.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/परिभाषा" पासून हुडकले