"प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — उकार (अधिक माहिती)
ओळ ४५:
== खेळ खेळताना ==
या खेळात खेळाडूंकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे व कवक असून त्यांची प्रत्येकाची हल्ला करण्याची व टिकाव धरण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही सर्व झाडे वापरून झोम्बींच्या कळपांना घरातील लोकांचे मेंदू खाण्यापासून थोपवता येते. खेळण्याचे क्षेत्र आडव्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असते. एक झोम्बी घराच्या दिशेने एकाच आडव्या पट्टीतून येतो. (जर त्याने गार्लिकचा (लसूण) भाग खाल्ला तर मात्र तो वेगळ्या पट्टीत जातो.)
बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारुनमारून व ''झेन गार्डन'' मधील झाडे विकून मिळू शकतात.
 
खेळाडू पातळी मर्यादित झाडांच्या बियांसह खेळ सुरू करतो. ही मर्यादा आभासी पैसे देऊन वाढवता येते. प्रत्येक पातळीच्या सुरुवातीला खेळाडूला आक्रमण करणाऱ्या झोम्बींचे प्रकार दाखवले जातात व त्यांच्याविरुद्ध लागणारी झाडे खेळाडूला निवडता येतात. कवक दिवसा झोपतात, त्यामुळे त्यांना "कॉफी बीन" नावाचे झाड वापरून उठवावे लागते. कवक त्यांच्या कमी सूर्यकिंमतीमुळे रात्रीच्या पातळ्यांसाठी आदर्श असतात. काही झाडे काही झोम्बींविरुद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट असतात, जसे की मॅग्नेट-श्रूम (चुंबक-कवक) हे बकेटहेड झोम्बी, लॅडर झोम्बी व फुटबॉल झोम्बी यांच्याकडील धातूच्या वस्तू (लोखंडी बादली, फुटबॉल शिरस्त्राण व शिडी) काढून घेऊन त्यांची शक्ती कमी करते.