"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
* मुहम्मद हे अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत. (महम्मदे रसूल-अल्लाह)
* दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे
* आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज) ( शक्य असल्यास)
* आपल्या मिळकतीतील अडीच% मिळकत गोरगरिबांसाठी दान करणे. (जकात)
 
ओळ १८:
इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना (अनेकेश्वरवाद) पूजता कामा नये.
 
मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने (अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी [[कुराण|कुर्आन]] उलगडवले. या कामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुरआन व मुहंमद पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहंमद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या गोदरचे(??)अगोदरचे एकेश्वरवादी अब्राहमिक धर्म आज सनातनी, यहुदी व ख्रिस्ती धर्म या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले, असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माचे मुहम्मदद्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.
 
इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना [[इस्लामचे पाच स्तंभ]] पाळावे लागतात. ज्यांनी संपूर्ण मुस्लिम समाजाला बांधले आहे, अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत.. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले