"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
ओळ ८:
विश्व हे मूलतः [[अणू|अणूंपासून]] बनलेले आहे आणि अणूंच्या रचनेतले घटक कृष्णविवर निर्मितीस कारणीभूत ठरतात. अणू मधे केंद्रात [[प्रोटॉन]] , [[न्युट्रॉन]] आणि [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] हे अतिसूक्ष्म कण असतात. अणूचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रात एकवटलेले असते आणि तुलनेने हलके [[विजाणू|इलेक्ट्रॉन]] त्या केंद्राभोवती फिरत असतात. दोन अणूंच्या संयोगावेळी हे इलेक्ट्रॉन दोन केंद्रात पुरेसे अंतर राखायला मदत करतात. आकाशस्थ ग्रहाच्या केंद्रातील अणूंची रचना पृष्ठभागावरील अ्णूंप्रमाणेच असते.परंतु ताऱ्याच्या केंद्रात वेगळी परिस्थिती असते. [[नुक्लिअर चेन रिॲक्शन]]नुसार ताऱ्याच्या गाभ्यात [[हायड्रोजन]]चे रूपांतर [[हेलियम]]मध्ये होत असते. आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातील फरकाचे प्रचंड उर्जेत रूपांतर होते. ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जाऊन ताऱ्याला प्रसरण अवस्थेत ठेवते व तारा तेजस्वी दिसतो.
 
एखादा तारा मृत पावल्यावर त्याच्या तीन अवस्था संभवतात. खुजा तारा ( The White Dwarf ), न्यूट्रॉन तारा किंवा कृष्ण विवर<ref>{{cite web |last=वाटसरु |first=विज्ञानाचा |title=कृष्ण विवरांबद्दल थोडक्यात ! भाग पहिला : निर्मिती |url=http://v-vatasaru.com/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%b2-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af/|accessdate=23 May 2020|df=dmy-all}}</ref>. तार्यामधीलताऱ्यामधील इंधन संपत आल्यावर अखेर एक वेळ अशी येते जेव्हा ताऱ्याच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो आणि रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरुवात होते. अखेरीस जेव्हा हेलियमसुद्धा संपतो तेव्हा ताऱ्याचा पृष्ठभाग केंद्राच्या दिशेला कोसळतो. तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचा वेग जास्त, त्‍यामुळे प्रचंड मोठे तारे संख्येने कमी असतात. आपल्या सूर्याचे इंधन संपायला एक हजार कोटी वर्षे लागतील. तर सूर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५० कोटी वर्षेच टिकेल.{{संदर्भ हवा}} जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो त्या ताऱ्याला सुपरनोव्हा म्हणतात. सुपरनोव्हानंतर ताऱ्याचे प्रचंड द्रव्य आतल्या बाजूला कोसळते. या द्रव्याचा दाब इतका प्रचंड असतो की अणूंमधील इलेक्ट्रॉन बंध तुटतात आणि ताऱ्याचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणती ताऱ्याचे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते. अशा प्रकारे सुपरनोव्हानंतर तारा हा वस्तुमानानुसार [[न्यूट्रॉन तारा]], [[पल्सार]] वा कृष्णविवर बनतो.
 
===कृष्णविवराची रचना===