"आफ्रिकन मोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३४:
 
== वर्तन आणि पर्यावरणशास्त्र ==
काँगो मोर हा एक सर्वभक्षी पक्षी आहे ज्याचे मुख्य भक्ष्य फळे आणि कीटक असतात. सालोंगा नॅशनल पार्कमध्ये नोंदवल्या नुसार त्यांच्या आहारात ''अ‍ॅलनब्लॅकिया फ्लोरिबुंडा'', ''कॅनेरियम श्वेनफुर्थी'', ''ऑइल पाम'', ''क्लेनेडोक्सा गॅबोनेन्सिस'', ''आफ्रिकन ब्रेडफ्रूट'', आणि ''झायलोपिया एथिओपिका'' ची फळे व बिया तसेच अनेक कीटक, कोळी आणि मॉक्सस इत्यादीचा समावेश दिसून आला.<ref>{{जर्नल स्रोत|last=Mulotwa, M.|last2=Louette, M.|last3=Dudu, A.|last4=Upoki, A.|year=2006|title=The Congo Peafowl ''Afropavo congensis'' in Salonga National Park (Democratic Republic of Congo)|journal=Malimbus|issue=28|pages=52–53|pmc=amp}}</ref>
 
सालोंगा नॅशनल पार्कमध्ये, मुख्य जंगलापेक्षा दुय्यम जंगलात त्याच्या आहाराची यादी वरील नोंदीपेक्षा कमीच आहे. नराचे मिलनाच्या वेळचे पिसारा फुलवून नाचण्याचे प्रदर्शन मोराच्या इतर प्रजातींसारखेच असते. काँगो मोरात प्रत्यक्षात त्याच्या शेपटीला जोडून त्याचा पिसारा असतो, तर इतर मोरात त्यांच्या पाठीवरून शेपटीच्या गुप्त पंखांना पिसारा असतो. काँगो मोर एकपत्नी आहे असे दिसून आले आहे. या प्रजातीचे मोर उंच आवाजात "गोवे" अशा अशी साद घालतात, तर लांडोर कमी उंचीत "गोवा" अशी प्रतिसाद देते. या जातीत दोन्ही लिंगांचे ''रो-हो-हो-ओआ'' असे सूर असलेले मोठे द्वंद्वगीते प्रसिद्ध आहेत.