"चरखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — उकार (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १७:
 
==सूत कातण्याची पद्धत ==
भारतात हाताने सूत कातण्यासाठी टकळी व चरखा ही साधने वापरतात, असे सूत मुख्यतः खादीच्या कापडासाठी वापरतात [ → खादी उद्योग]. जानव्याच्या सुतासारखे सूत कातण्यासाठी खेड्यात अजूनही टकळी वापरतात. टकळीवरील सूतकताईची पद्घत चातीवरील सूतकताईसारखी आहे. एका टोकाशी काहीसा आकड्यासारखा आकार दिलेली जाडसर तार व दुसऱ्या टोकाजवळ बसविलेली वजनदार तबकडी असे टकळीचे स्वरुप असते. ही तबकडी ⇨ प्रचक्रा चे किंवा जड चक्राचे काम करते. डाव्या हातातील कापसाचा पुंजका वा पेळू टकळीच्या आकड्यासारख्या टोकाला अडकवून तो हात वर नेतात. यामुळे कापसाचे तंतू ओढले जाऊन त्यांची परस्परव्यापी, जवळजवळ समांतर मांडणी होऊन तंतूंची लांब रचना तयार होते. नंतर टकळी उजव्या हाताने वर्तुळाकार फिरवून तंतूंना थोडा पीळ देतात. यामुळे तंतूंची सैलसर वात तयार होते. नंतर टांगलेल्या मुक्त स्थितीत टकळी उजव्या हाताने जोराने फिरवितात. टकळीच्या वजनदार तबकडीला संवेग मिळून तंतूंना पीळ बसत असताना ते खाली खेचलेही जातात. अशा रीतीने पुरेशा लांबीचे म्हणजे हातभर सूत तयार झाले की ते टकळीच्या तारेवर गुंडाळतात. नंतर ही सर्व प्रक्रिया पुन:पुन्हा करून सूत कातले जाते. हलक्या स्थितीतील टकळीचे वजन पेलू न शकणाऱ्या तंतूंच्या बाबतीत टकळी जमिनीवर टेकवून सूतकताई करतात. टकळी व चाती हजारो वर्षांपासून वापरली जात असून ईजिप्तमध्ये लिननचे सूत कातण्यासाठी, तर भारतात कच्चे सुती धागे कातण्यासाठी तिचा वापर होतो.<ref>[vishwakosh.marathi.gov.in/26021 सूतकताई]</ref>
 
==संदर्भ==
ओळ २६:
[[वर्ग:कला]]
[[वर्ग:हस्तकला]]
[[वर्ग:मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चरखा" पासून हुडकले