"भौतिकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ ८:
== इतिहास ==
नैसर्गिक घटना, त्यांच्या मागचा कार्यकारणभाव, त्यांचे परिणाम यांच्या अभ्यासाच्या पद्धती तत्त्वज्ञानातून विकसित झाल्या. पुढे विविध प्रागतिक टप्प्यांवर या अभ्यासाला नैसर्गिक-तत्त्वज्ञान व नंतर नैसर्गिक-शास्त्र अशी नावे मिळाली. अंतिमतः सध्या आपण त्याला भौतिकशास्त्र या नावाने ओळखतो. हाच इतिहास पुढील काही परिच्छेदांमध्ये वर्णन केला आहे.<br /> <br />
'''नैसर्गिक-तत्त्वज्ञान''' याची पाळेमुळे पुरातन ग्रीक कालखंडात (ख्रिस्तपूर्व ६५०-४८० वर्षे) शोधता येतात. सॉक्रेटीस-पूर्व काळात थेल्स याने नैसर्गिक घटना घडण्यामागे काही अतिभौतिक, धार्मिक अथवा दैवी शक्तींचा हात असतो हे नाकारून त्यामागे केवळ नैसर्गिक कारणच असते असे प्ततिपादन केले. काळजीपूर्वक मांडलेले विचार व प्रयोगांच्या परिणामांचे केलेले निरीक्षण यांमुळे संकल्पना सिद्ध करता येतात हेही त्याच्यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी दाखवून दिले. आधुनिक काळात अणु व रेणुंचे अस्तित्त्वअस्तित्व सिद्ध करता आल्याने मुलभूत, अविभाज्य कणांनी सर्व पदार्थ बनलेले असतात हा प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींमधील विचारवंतांनी मांडलेला सिद्धांत पडताळून पहाता आला.<br /> <br />
 
'''नैसर्गिक-विज्ञान''' हे ख्रिस्तपूर्व सुमारे ४थे ते १०वे शतक या काळात भारत, चीन व अरब प्रदेशात विकसित झाले.{{संदर्भ हवा}} विविध मोजमापांचे गणन करण्याची पद्धती याच काळात प्रयोगकर्त्यांमधे रुजली. घटनांची निरीक्षणे करणे, वैचारिक प्रयोग करून बघणे अशा पद्धती वापरून युरोपमध्ये आर्किमिडीज तसेच मध्यपूर्वेत अल्बेरूनी यांनी स्थितिशास्त्र (इंग्रजी: ''statics'') किंवा स्थैतिकी, [[यामिकी]] , द्रव-स्थितिशास्त्र (इंग्रजी: ''hydrostatics'') याचा पाया रचला.