"सूफी अंबा प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ६२:
== काही ठळक घटना ==
# सूफीजींना जन्मापासूनच उजवा हात नव्हता. मित्र विचारत तर ते म्हणत, "अरे मी राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यात इ.स. १८५७ मध्ये लढताना हात गमावून बसलो, इ.स. १८५८ मध्ये जन्म झाला तो हात तसाच राहिला !"
# सूफीजी हे वेषांतरात पटाईत होते. इ.स. १९०८च्या१९०८ च्या सुमारास इंग्रज सरकारने सर्वत्र धरपकड चालू केली होती. तेव्हा सूफीजी आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर साधूचा वेष घेऊन गिरीभ्रमण करीत होते. वाटेत सुट-बूट घातलेला माणूस त्यांच्या सरळ पायी पडला आणि त्याने नम्रतेने विचारले 'महाराज,आपण कोठे राहता?'. त्यावर सूफीजी रागाने उत्तरले 'तुझ्या डोक्यात !'. तो माणूस पुन्हा नम्रपणे म्हणाला 'महाराज,आपण माझ्यावर रागावलात का ?'. त्यावर सूफीजी म्हणाले 'अरे मुर्खा,इतके साधू असताना तू मलाच का नमस्कार केलास?'. तो माणूस म्हणाला 'मी आपणासच साधू समजलो'. ह्यावर सूफीजींनी त्याला भोजनाची व्यवस्था करायला सांगितली. उत्तम भोजन झाल्यावर सूफीजींनी त्याला विचारले 'काय रे,आमची पाठ केव्हा सोडणार?'. तो माणूस गडबडला.सूफीजी त्याला म्हणाले 'चालबाजी सोड,आलाय हेरगिरी करायला ! तुझ्या बापाला जाऊन सांग की आम्ही विद्रोह करणार आहोत!'
# इ.स. १८९० मध्ये भोपाळ संस्थान खालसा करता यावे याकरिता तिथला इंग्रज रेसिडेंट हा भोपाळच्या नवाबाच्या अनेक खोट्या तक्रारी सरकार व लोकांकडे करीत असे. एके दिवशी त्या रेसिडेंटच्या घरी एक वेडसर माणूस नोकरीस आला. तो कामाच्या बदल्यात फक्त अन्न मागत असे. भांडी घासताना सगळी राख अंगाला फासून घेत असे व त्यामुळे इतर नोकरांकरिता तो एक करमणुकीचा विषय झाला होता.बाजारहाट हा त्याच्याच हाती दिला गेला होता कारण तो भाव-ताव करण्यात तरबेज होता. ह्याच सुमारास बंगालच्या 'अमृत बाजार पत्रिका' यात रेसिडेंटच्या विरोधात अनेक मजकूर छापून येवू लागले. रेसिडेंटला कळले की कोणी हेर ही सर्व माहिती पत्रास पाठवत आहे. त्याने त्वरित हेरास पकडून देणाऱ्या व्यक्तीस भरघोस बक्षीस जाहीर केले.पोलिसांनी जंग-जंग पछाडून सुद्धा त्या हेराचा मागमूस लागला नाही. शेवटी त्या रेसिडेंटास काढून टाकण्यात आले/बदली झाली. दिल्ली स्टेशनावर ह्या रेसिडेंटास एक विलायती सुटा-बुटातील अस्खलित इंग्रजी बोलणारा एक मनुष्य भेटला. त्यास बघून रेसिडेंट चक्रावून गेला - हा मनुष्य त्याच्या घरी भांडी घासणारा वेडसर मनुष्यच होता ! त्या मनुष्याने रेसिडेंटाकडे बक्षिसाची मागणी केली. ह्यावर रेसिडेंट म्हणाला ' मी तर तुला निघताना बिदागी दिली होती'. तो मनुष्य म्हणाला तुमच्यावर हेरगिरी करणाऱ्या मनुष्यास पकडून देण्याचे इनाम मला हवे आहे'.ह्यावर रेसिडेंट अधीर होवून म्हणाला 'तू त्यास पकडून देऊ शकतोस काय?'. त्यावर तो मनुष्य म्हणाला 'मीच तो हेर आहे !'. रेसिडेंट पार घाबरून गेला - त्याला वाटले की आता हा क्रांतिकारी आपल्याला गोळी घालणार. त्यास सोन्याचे घड्याळ असलेली साखळी देऊन 'सरकारी गुप्तहेर विभागात उच्चपदी तुला महिना १०००ची नोकरी मिळवून देतो'. त्यावर सूफीजी म्हणाले 'पैशाची हाव असती तर मी तुझ्या घरी भांडी घासायला आलो नसतो !' आणि ते तिथून निघून गेले.