"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ७४:
===शोकांतिका(शोकात्मिका)===
* शेक्सपिअरच्या ‘रोमिओ ॲन्ड ज्युलिएट’ या शोकांतिकेपासूनच त्याला नवीन वाट सापडली असे म्हणता येते. कोवळ्या प्रेमाचे हृदयाला हात घालणारे, अत्यंत प्रभावी व उत्कट दर्शन, काव्यसौंदर्य आणि चटका लावणारा दैवदुर्विलास वर्णन करणारी कथा यामुळे हे नाटक अत्यंत लोकप्रिय ठरले. या नाटकाचा प्रभाव एवढा होता, की काही काळानंतर लोक रोमिओ व ज्युलिएट या खऱ्या व्यक्ती आहेत असेच समजू लागले, आणि आजही समजतात.
* १५९९च्या१५९९ च्या सुमारास शेक्सपिअरने लिहिलेली आणखी एक श्रेष्ठ शोकांतिका ‘ज्युलियस सीझर’ ही आहे. नायकाच्या मनातील आंतरिक संघर्षांतच शोकात्मिकेचे बीजारोपण होते हे तत्त्व शेक्सपिअरने याच नाटकात प्रथम मांडले व नंतर त्याचा विस्तार अनेक नाटकांतून केला. ब्रूट्सच्या मनात मित्रप्रेम मोठे की स्वातंत्र्यप्रेम हा संघर्ष निकराला आला होता. यातूनच नाटकामधील पुढील शोकांतिका घडली.
* ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’ आणि ‘अ‍ॅन्टनी ॲन्ड क्लिओपाट्रा’ या नाटकांतून शेक्सपिअरच्या प्रतिभेचे अत्युच्च दर्शन घडते. १६०१ ते १६०८ या दरम्यान लिहिलेल्या या शोकांतिका एकाहून एक अधिक भीषण व यातनांचे वर्णन करणाऱ्या आहेत. विश्वासघात, कपटकारस्थाने, सूड, मत्सर, व्यभिचार, राक्षसी महत्त्वाकांक्षा यांचे विकराळ दर्शन त्याने या नाटकांतून घडविले आहे. पण त्याबरोबर श्रेष्ठ मानवी मूल्ये, नियती, ईश्वरी न्याय व मृत्युचिंतन यांचाही नाटककाराने येथे सूक्ष्म विचार केला आहे असे जाणवते.
 
ओळ ३३९:
 
==शेक्सपिअरच्या नाटकांची कथानके==
गणेश ढवळीकर (निधन : सन १९६५) यांनी १९५५च्या१९५५ च्या सुमारास अनुवादित केलेल्या शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथा अनेक वर्षे बासनात राहिल्या होत्या. पुढे या कथा भारद्वाज प्रकाशनने 'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकाद्वारे २०१५ साली प्रकाशित केल्या. वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ढवळीकर इंग्रजीचे अध्यापन करायचे. त्यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणतानाच स्वतःचेही वेगळे लेखन केले होते. १९६५मध्ये त्यांचे निधन झाले. ते हयात असताना त्यांचे साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ शकले नाही. पुढे ते काळाच्या ओघात नष्ट झाले. शेक्सपिअरच्या नाटकांच्या या अनुवादित कथा त्यांची नात मीरा आपटे ढवळीकर यांच्याकडे होत्या. भारद्वाज प्रकाशनचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांनी जीर्ण झालेल्या कागदांवर लिहिलेल्या त्या कथा नव्या स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत.
 
या कथा पुढे भारद्वाज प्रकाशनने ‘शेक्सपिअरच्या नाट्यकथा’ या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणल्या. ‘इंग्रजीचे अध्यापन करताना ढवळीकर यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणताना स्वतंत्र लेखनही केले होते. ढवळीकर यांनी केलेला कथारूप अनुवाद मराठी साहित्याला वेगळा आयाम देणारा ठरला आहे. या अनुवादामध्ये ६० वर्षांपूर्वीच्या भाषाशैलीचा प्रत्यंतर येतो. या कथांचे पुस्तक करताना मूळ लेखनामध्ये कोणताही बदल केलेला नाही. केवळ मराठी शुद्धलेखनाच्या नव्या नियमांनुसार बदल करून घेण्यात आला आहे. नव्या पिढीपर्यंत शेक्सपिअर पोहोचविण्यासाठी या कथा महत्त्वाच्या ठरल्या आहेत..