"रायगड (किल्ला)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
खूणपताका: Reverted 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५२:
'''२. खुबलढा बुरूज ''': गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.
 
'''३. नाना दरवाजा ''': या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४च्या१६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
 
'''४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा ''': चित्‌ दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.