"रानी की वाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — वेलांटी (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
गुजरात राज्यात 'बावडी' किंवा 'वाव' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहिरी आहेत. या विहिरींना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात तसेच विश्रांतीसाठी मजले, छत आणि हे ठिकाण रमणीय व्हावे म्हणून कोरीव काम केलेले असते. गुजरातमधील [[पाटण]] या जिल्ह्याच्या गावी असणारी अशी विहीर 'राणी निराणीनी वाव' या नावाने प्रसिद्ध आहे. २२ जून २०१४ मध्ये [[युनेस्को जागतिक वारसा स्थान|युनेस्कोच्या जागतिक वारसा]] यादीत या स्थळाचा समावेश झाला<ref>http://whc.unesco.org/en/list/922</ref>.
 
== इतिहास ==
ओळ ६:
[[पाटण]] गावाजवळून पुरातन अश्या [[सरस्वती नदी|सरस्वती]] नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत. पण या विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली जाऊ लागली. १९८०च्य सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्खनन करून ही वाव प्रकाशात आणली.
 
[[पाटण]] पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव आता 'राणी निराणीनी वाव' (राणीची विहीर)साठी पण प्रसिद्ध आहे.
 
== वास्तू विशेष ==
ओळ १४:
गुजरातमधील वाव या फक्त पाणी भरण्याच्या जागा नव्हत्या तर सामाजिक अभिसरणाचे केंद्र होत्या. पाणी भरायला येणारे लोक विसावण्यासाठी बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून उत्तम विचार आणि इतिहास याची माहिती मिळेल असा विचार या बांधकामात होता.
 
[[दशावतार]], [[चामुंडा]], [[कल्की]], महिषासुरमर्दिनी, [[हनुमान]], शिव पार्वती, [[मातृका]], सूर सुंदरी अशा अनेक कोरीव मूर्ती 'राणी निराणीनी वाव' येथे पाहायला मिळतात.
 
<gallery>