"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ५४:
 
==मेहकर शहर आणि तालुका==
मेहकर हे अजिंठ्याच्या पर्वत रांगेत वसलेले शहर आहे. शहराजवळून पैनगंगा नदी वाहते. आधीच हा सुपीक भूभाग होता आणि त्यातच कोराडी, उतावळी, पेनटाकळी या सिंचन प्रकल्पांमुळे तालुक्यातील ओलीत क्षेत्रात वाढ झाली. १९०१ मध्ये मेहकर शहराची लोकसंख्या ५ हजार ३३० होती. १९८१च्या१९८१ च्या जनगणनेनुसार ती २२ हजार ३८२ तर, आता ६० हजारावर पोहोचली आहे. जुन्या मेहकर तालुक्यात मेहकरसह [[लोणार]] व [[सिंदखेड राजा]] तालुक्यांचा समावेश होता. आजही तिन्ही तालुक्यांची विविध खात्यांची उपविभागीय कार्यालये मेहकर शहरातच आहेत.
 
==इतिहास आणि धार्मिक स्थाने==
ओळ ६५:
मेहकरातील बालाजीबरोबरच गोपालकृष्ण मंदिर, [[विठ्ठल]] मंदिर, [[गणपती]] मंदिर, [[दत्त]] मंदिर, [[चंदनशेष]] मंदिर, [[हनुमान]] मंदिर, महानुभाव मठ, पंचपीर, राममंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. यात मारुतीची ८ तर, गणपतीची ३ मंदिरे आहेत. शहरात मशिदींची संख्याही मोठी आहे. अलबेरुनीच्या ग्रंथात,[[आईन-ए अकबरी]] या अकबरनामाच्या तिसऱ्या भागातही येतो. एका मुस्लिम कवीने लिहून ठेवले आहे की, मेहकर हे हिजरी सनापूर्वी ७९५ वर्षे याकाळात अस्तित्वात असलेले जुने गाव आहे. महसुली जिल्ह्याचे जसे हे पूर्वी मुख्य गाव होते, तसाच मेहकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जिल्हा, असे मानले जाते.
 
धार्मिकता हा येथील माणसांच्या जगण्यातील अंगभूत गुण तसेच, त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातले कार्यही वाखाणण्याजोगे आहे. अनेक क्षेत्रांना या गावाने नेतृत्व प्रदान केले. कै.अण्णासाहेब देशमुख हे त्यापैकीच एक. दुसरबीड येथे त्यांनी उभारलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून १९६२ ते १९७८ असे सलग १६ वर्षे ते या बँकेचे अध्यक्ष होते. १९७२च्या१९७२ च्या भीषण दुष्काळात साखर कारखाना उभारणीच्या काळात काम नसलेल्या शेकडो हातांना काम देण्याचे मौलिक कार्य अण्णासाहेबांनी केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. शुकदास महाराजांच्या पुढाकाराने साकारलेला स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम येथे आहे. विवेकानंद आश्रम हे मानव सेवेचे केंद्र आहे. आज तेथे शाळा, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, विविध वसतिगृहे, कर्णबधिर -अपंग निवासी विद्यालय विवेकानंद ज्ञानपीठ (इंग्रजी माध्यम) व आरोग्य विषयक सेवा, धमार्थ रुग्णचिकित्सा केंद्र, रोगनिदान शिबिरांचे आयोजन, कृषी प्रदर्शनांचे आयोजन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, विवेकानंद वाटिका, हरिहर तीर्थक्षेत्र, इत्यादींमुळे शहराला नंदनवनाचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्र शासनाने विवेकानंद आश्रमास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. विवेकानंद जन्मोत्सव दरवर्षी पौष वद्य पंचमी ते सप्तमी दरम्यान भव्य प्रमाणात साजरा केला जातो. तिन्ही दिवस नामवंत कलाकार, संगीतकार, गायक, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार आपली सेवा देतात. पौष वद्य सप्तमीला तीन लाख भाविक महाप्रसाद सेवन करतात.
 
==राजकीय पार्श्वभूमी==
जनपद सभेच्या काळात मेहकर व परिसरात दलितमित्र कै. आयाजी पाटील यांनी [[हुंडाबंदी]], सामूहिक विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन, [[हरितक्रांती]], पर्यावरण या सर्वच क्षेत्रांत अजोड काम केले. त्यांच्या भारदस्त व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा युवकांवर मोठा प्रभाव होता. सहकार व शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांनी भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक नवीन नेतृत्वांना त्यांनी संधी दिली. त्यांच्या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने मेहकरात पहिल्यांदा मुख्यमंत्री आले. मेहकरच्या जडणघडणीत अनेकांनी योगदान दिले. माजी आमदार भाऊसाहेब लोढे हे त्यापैकीच एक. त्यांच्या कार्यकाळात मेहकरला पहिली पाणीपुरवठा योजना झाली. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मेहनत घेतली. मेहकर मतदारसंघात लोणार तालुकाही येतो. त्यामुळे त्या तालुक्यातही त्यांच्या कार्याची लोक आजही आठवण करतात. मतदारसंघ राखीव होता तेव्हा तुळशीराम कंकाळ, लक्ष्मण गवई, बळीराम वानखेडे हे आमदार येथे होऊन गेले. कॉंग्रेसचे आमदार म्हणून कै. किसनराव सांगळे यांची कारकीर्दही गाजली पण, खऱ्या अर्थाने गाजला तो सुबोध केशव सावजी यांचा कार्यकाळ. सलग १४ वर्षे ते आमदार होते. काही काळ ते महसूल, वस्त्रोद्योग आदी खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात मेहकरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना (कोराडी प्रकल्पातून) मंजूर झाली. मेहकरातील बरीच विकासकामे त्यांच्या हातून झाली. या सर्व कालखंडात डॉ. पळसोकर, डॉ. देशमुख, माणिकचंद जैन, नलिनीताई खडसे, शोभाताई अग्रवाल या नगराध्यक्षांनी लक्षात राहण्याजोगे काम केले.
 
नंतरच्या काळात म्हणजे १९९५ पासून मेहकर मतदारसंघातर्फे कॉंग्रेसचे वर्चस्व संपले आणि १९९५च्या१९९५ च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांच्या रूपाने शिवसेनेचा आमदार या मतदारसंघाला मिळाला. युतीच्या काळात युवक कल्याण पाटबंधारे खात्याचे ते राज्यमंत्री झाले. सध्या ते बुलढाण्याचे खासदार आहेत. मेहकरसाठी त्यांनी रस्ते, नालीबांधणी, वीज, पाणी आदी बाबींकरिता पैसा खेचून आणला. नगराध्यक्ष म्हणून जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर यांची कारकीर्द नियोजनबद्ध विकास कामांच्या बाबतीत लक्षणीयच ठरली. एकात्मिक शहर विकास योजनेचा आराखडा त्यांच्या काळातच तयार होऊन शासनाकडे गेला. त्यातील एकेक काम नंतरच्या काळात होत आहे. रामराव म्हस्के, कासमभाई गवळी, संजय जाधव या नगराध्यक्षांनीही रस्ते विकासाच्या बाबतीत काम केले. सामाजिक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कार्य केलेले डॉ. संजय रायमूलकर सध्या शिवसेनेचे आमदार आहेत.
 
शहराच्या नवीन भागात वाढ झाल्याने शहराचे भौगोलिक क्षेत्र विस्तारले. तेथे रस्ते, पाणी, नाल्या या समस्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी खासदार, आमदार, नगराध्यक्ष, यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी आणखी जोरकस प्रयत्नांची नागरिकांची मागणी आहे. शहराला सध्या आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा होतो. हा कालावधी कमी करणे गरजेचे आहे. कारण, कोराडी, पेनटाकळीसारखे मोठे प्रकल्पजवळ आहेत. [[चिखली]], बुलढाणा शहरांना येथून पाणी पुरवले जाते. ४० पेक्षा जास्त खेडेगावांना हे प्रकल्प शेतीबरोबरच पिण्याचे पाणी पुरवतात. मेहकरच्या पाणी पुरवठ्यात नियोजनाचा मोठा अभाव आहे. सुसूत्रता आणली तर दिवसाआडही पाणी पुरवणे शक्य असल्याचे यापूर्वी नलिनीताई खडसे व श्याम उमाळकर या नगराध्यक्षांनी दाखवून दिलेले आहे. शहरात एकही बगीचा नाही. जागा मात्र बऱ्याच ठिकाणी आरक्षित आहे. तेथे बागबगिचे होणे, वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी शहरात टाऊन हॉलची गरज आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेहकर" पासून हुडकले